St Bus  Saam tv
मुंबई/पुणे

Konkan Ganpati ST Bus Service: चाकरमान्यांसाठी खूशखबर; गणपतीत कोकणात जाताय? बिनधास्त जा! एसटीने घेतला मोठा निर्णय

Konkan Ganpati Special ST Bus : चाकरमान्यांसाठी खूशखबर हाती आली आहे. गणपतीत कोकणात जाणाऱ्यांची चिंता मिटली आहे. एसटीने घेतला मोठा निर्णय घेतलाय.

Vishal Gangurde

गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर हाती आली आहे. एसटी महामंडळ यंदा गणपतीत ५००० हून अधिक बस सोडण्यात येणार आहे. २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात एसटी मंडळाकडून ज्यादा बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तर २२ जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ज्येष्ठांना देखील तिकीट दरात मोठी सवलत मिळणार आहे. एसटी बाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

'गणेशोत्सव कोकणातील लोकांचा महत्वाचा सण मानला जातो. गणपती बाप्पा, कोकणातील चाकरमान, एसटी बसचं एक अतुट नातं आहे. यावर्षी देखील गणपतीत कोकणात जाणाऱ्या भक्तांच्या सेवेसाठी नफा-तोट्याचा विचार न करता एसटी महामंडळ दरवर्षी जादा बस सोडत आहे. या वर्षी देखील ५००० जादा गाड्या कोकणात जाणार आहेत, असं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं.

बसमधील सीटचं आरक्षण हे npublic.msrtcors.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बसस्थानकात किंवा MSRTC Bus Reservation या अॅपवर देखील आरक्षण करण्याची सुविधा आहे. एसटी महामंडळाने आषाढी एकादशीला ५२०० हून अधिक एसटी बस सोडल्या होत्या.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत आहे. तर महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून २३ ऑगस्टपासून जादा बसेस सोडण्यात येणार आहे. मागच्या वर्षी ४३०० बस सोडल्या होत्या.

गणेशोत्सवादरम्यान एसटी बसची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बसथांब्यावर देखील एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT