Ashok Chavan and Sachin Sawant on Kolhapur Election result
Ashok Chavan and Sachin Sawant on Kolhapur Election result SAAM TV
मुंबई/पुणे

भाजपला निरूत्तर केलं; जयश्री जाधव यांच्या विजयानंतर काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई/ कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव केल्यानंतर, निवडणूक प्रचारात 'भाजप हेच उत्तर' अशी टॅगलाइन असलेल्या भाजपवर काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला. राज्याचे मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपला टोला लगावला आहे. कोल्हापूरकरांचे जोरदार प्रत्युत्तर, भाजपला केले निरुत्तर, असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. खरी लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्यानं ती अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव केला. यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महाविकास आघाडीसह काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण यांनी ट्विट करून भाजपला टोला लगावला आहे. 'कोल्हापूरकरांचे जोरदार प्रत्युत्तर, भाजपला केले निरुत्तर...शिवराय, शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार हेच खरे उत्तर', असं चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. उत्तर कोल्हापूरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव, सतेज पाटील, राजेश क्षीरसागर आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन, असंही ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

सतेज पाटील यांच्या नेतृत्वाचा हा विजय - सचिन सावंत

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजयानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही ट्विट करून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजयाने कोल्हापूरकर हे द्वेष- तिरस्काराचे राजकारण मान्य करत नाहीत आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे अधोरेखित झाले. हा सतेज पाटील यांच्या नेतृत्वाचा विजय आहे, असं सावंत म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे. बिलोली देगलूर निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी जनता आहे, हे पुन्हा दिसून आले. भाटपच्या 'ईडी'वादाचा हा पराभव आहे. धर्मांधता आणि भाजपच्या नेत्यांचे गलिच्छ राजकारण जनतेने नाकारले, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News | तर अजित पवारांना दुध विकावं लागलं असतं, राऊत यांचा घणाघात

Sahil Khan Arrest : मोठी बातमी!, साहिल खानाला मुंबईत आणलं; कोर्टाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी

Summer Kitchen Hacks : उन्हाळ्यात स्वयंपाक घरात हैराण झालात? या टिप्सच्या मदतीने राहिल किचनमध्ये थंडावा

Today's Marathi News Live: इंडिया आघाडीत डब्बे नाही, प्रत्येकाला इंजिन बनायचं आहे; देवेंद्र फडणवीस

Health Tips: टॉमेटो खा अन् स्वस्थ राहा, जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT