कोल्हापुरच्या जनतेने भाजपच्या धर्मांध राजकारणाला नाकारले : बाळासाहेब थोरात

हा विजय जनतेचा महाविकास आघाडीवर असलेला विश्वास आहे, असंही थोरात म्हणाले.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam Tv

मुंबई : कोल्हापुरातील उत्तर विधानसभा निवडणुकीचा (Election) निकाल होती आला आहे. यात महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा १९ हजार मतांनी विजय झाला आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून जल्लोष सुरु आहे. काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. कोल्हापुरच्या स्वाभिमानी जनतेने भाजपच्या धर्मांध राजकारणाला नाकारले असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. (Kolhapur North Election Result)

कोल्हापूर (Kolhapur) मधील स्वाभिमानी मतदारांनी भाजपची दहशत, दडपशाही, प्रलोभनांना व धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी केले. हा विजय जनतेचा महाविकास आघाडी वर असलेला विश्वास अधोरेखित करतो, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat
Kolhapur Election Updates | निकालाआधीच कोल्हापुरात जयश्री जाधवांच्या विजयाचे बॅनर्स !;पाहा व्हिडीओ

'भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरच्या मतदारांवर ही निवडणूक लादली होती, जाधव कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहात महाराष्ट्राने आजवर जपलेल्या राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन भाजपने करायला हवे होते, मात्र तसे न करता वेगवेगळे आरोप करण्यात आले. ताराराणीच्या भूमीत महिला असलेल्या जयश्री ताईंचा अपमान करण्याचे पातक भाजपने केले. मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने आजच्या निकालातून भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे, असंही थोरात म्हणाले.

महाविकास आघाडीचा विजय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक गांभीर्याने घेण्याची सूचना महाविकास आघाडीच्या सर्वच नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती. ज्येष्ठ नेते शरद पवारही या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले, त्यांच्या एकाजुटीमुळेच हा विजय साकारला, असेही थोरात म्हणाले. (Kolhapur North Election Result)

Balasaheb Thorat
Chandrakant Patil : कोल्हापूर हे हिंदुत्ववादी शहर - चंद्रकांत पाटील

जनतेने भाजपचा धर्मांध विचार नाकारला

स्व. चंद्रकांत जाधव हे सातत्याने कोल्हापूर (Kolhapur) शहराच्या विकासासाठी कार्यरत होते. त्यांच्या अकस्मित निधनामुळे झालेली पोटनिवडणूक काँग्रेसने विकासाच्या मुद्दयावर लढवली पण भाजपने या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला पण कोल्हापूरच्या जनतेने भाजपचा धर्मांध विचार नाकारून कोल्हापूरचा विचार हा समतेचा, प्रबोधनाचा..! आणि कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांचे, महाराणी ताराबाईंचे...! आहे, हे दाखवून दिले आहे, असंही थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com