प्रसिद्ध बिल्डर ते 600 कोटींची संपत्ती, कोण आहेत विशाल अग्रवाल?
Who is Vishal Agarwal? Saam Tv
मुंबई/पुणे

Who is Vishal Agarwal: प्रसिद्ध बिल्डर ते 600 कोटींची संपत्ती, कोण आहेत विशाल अग्रवाल?

साम टिव्ही ब्युरो

शनिवारी मध्यरात्री आलिशान पोर्शे कारनं एका बाईकला धडक दिली आणि या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. आता या हिट अँड रन प्रकरणावरून राज्यात चांगलंच रान पेटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापासून राज्यातील सगळ्याच विरोधी पक्ष नेत्यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटकही केली आहे. आज आरोपी मुलाच्या वडिलाला म्हणजेच विशाल अग्रवाल यांना कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशातच अपघातानंतर चर्चेत येणारे विशाल अग्रवाल नक्की आहेत तरी कोण? त्यांची संपत्ती किती आहे? त्यांचा व्यवसाय काय? हेच जाणून घेऊ...

कोण आहेत विशाल अग्रवाल?

विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांचं मोठं नाव असून ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे ते प्रमुख आहेत. ब्रम्हा कॉर्प ही पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी आहे आणि ब्रम्हदत्त अग्रवाल हे ब्रम्हा कॉर्पचे संस्थापक आहेत.

पुण्यात आणि मुंबईत ब्रम्हा कॉर्पने 2,000 हून अधिक इमारतींचे बांधकाम केले आहे. ब्रम्हा मल्टीस्पेस आणि ब्रम्हा मल्टीकॉन या कंपन्यांची जबाबदारी ब्रह्मदत्त अग्रवाल यांचा मुलगा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांच्याकडे आली. विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या असलेल्या कंपन्यांची एकूण मालमत्ता ही 6 कोटी 1 लाख 20 हजार इतकी आहे.

विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांची आवड आहे. पण त्यांच्या मुलानं 2 कोटींची कार चालवून दोघांचा बळी घेतला आणि अग्रवाल यांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि कोर्टात सुनावणी सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : 1 लाख टन कांदा खरेदीचा घोटाळा?; फेडरेशनच्या नावाखाली व्यापारी-अधिकाऱ्यांकडून लूट?

VIDEO: आधी हिजाबबंदी, आता ड्रेसकोडवरून चेंबूरमधील कॉलेजचा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला?

Ambadas Danve LoP: दानवे-लाड वाद पेटला; सभागृहात शिवीगाळ, अंबादास दानवेंचं निलंबन

LIC Scheme: जबरदस्त आहे LIC ची ही योजना, एकदा गुंतवणूक केल्यास आयुष्यभर दरमहा मिळणार 12,000 रुपये पेन्शन

Mumbai Crime : घराच्या मागच्या दरवाजातून शिरून गर्लफ्रेंडसोबत केलं भयानक कांड, गुन्हा कबुल करताच बापाने मुलाला पोलिसांत नेलं

SCROLL FOR NEXT