नालासोपाऱ्यात भाजी विक्रत्यांवर चाकूने हल्ला चेतन इंगळे
मुंबई/पुणे

नालासोपाऱ्यात भाजी विक्रत्यांवर चाकूने हल्ला

नालासोपारा तुलिंज परिसरात असलेल्या स्टेशन परिसरातील मार्केट मधील घटना

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई विरार - नालासोपारा Nalasopara मध्ये एका भाजी विक्रेत्या महिला व तिच्या सहकाऱ्यांवर एका दुसऱ्या भाजी विक्रेत्याने vegetable vendors चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. केवळ किरकोळ वादातून हे सर्व भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. नालासोपारा पूर्व मधिल स्टेशन परिसरात असलेले हे भाजी मार्केट आहे. हे संपूर्ण मार्केट अनधिकृत पणे इथे उभारण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी याच भाजी मार्केट मध्ये दोन फेरीवाल्यांच्या गटात मोठ्या प्रमाणावर भांडण झाले होते.

हे देखील पहा -

केवळ भाजी विकण्याच्या जागे वरून हा वाद झाला आहे. घटनास्थळा वरून नालासोपारा पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या आधी देखील महापालिकेच्या सहायक आयुक्तांवर कारवाई करतान असताना या मार्केट मधिल फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. एकी कडे ठाणे मधिल महिला अधिकारीवर फेरीवाल्या कडून हल्ला करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असताना नालासोपारा परिसरात फेरीवाले दादागिरी करताना दिसून येत आहे.

नालासोपारा स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या वेळी गर्दी असते. त्याच बरोबर स्टेशन परिसरात फेरीवाले आपले बाजार मांडत असतात. त्यालमुळे सर्व सामान्य माणसाच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसई विरार शहर महानगरपालिका असल्या बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या मार्केटवर कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही आहे. या संदर्भात नालासोपारा तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : विजांसह मुसळधार पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: कर्ज आणि मुलीच्या उपचाराच्या चिंतेने शेतकऱ्याने संपवलं जीवन

BJP MLA Accident: भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेलं; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

Sunday Horoscope: नशीब चमकणार! या 3 राशींना मिळणार मोठी संधी; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : दुसरी स्त्री आवडूनही पुरुष तिच्याशी नात्याची कमिटमेंट का करत नाहीत? ‘ही’ 5 कारणं

SCROLL FOR NEXT