Kishori Pednekar Saam Tv
मुंबई/पुणे

Kishori Pednekar: उद्यापासून मी महापौर नसले तरीही मुंबईची काळजी घेणार - किशोरी पेडणेकर

महापौर किशोरी पेडणेकर यांचा महापौर म्हणून आजचा शेवटचा दिवस आहे.

श्रेयस सावंत

मुंबई: महापौर किशोरी पेडणेकर यांचा महापौर म्हणून आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांचा कार्यकाळ आज संपतो आहे. त्यामुळे उद्यापासून आमची नवी इनिंग सुरु होईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच, पक्षाने दुसरी जबाबदारी दिली तरी मी कष्ट करणार, आमचे पक्ष प्रमुख जे सांगतील ते करणार, असंही त्या म्हणाल्या. त्या आज महापौरांच्या सदनात बोलत होत्या. ( Kishori Pednekars Last Day As Mayor Of BMC)

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे मानले आभार

"दोन गोष्टी नक्की आहेत. लोकशाहीमुळे निवडूण आलेलं हे सगळे नगरसेवक आहेत. ही 5 वर्ष खूप महत्त्वाची होती. उद्या पासून आमची नवी इनिंग सुरु होईल. पण लोकशाहीच्या मार्गाने आम्ही जाऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आभार मी माणते. मला महापौर म्हणून अनेक पुरस्कार मिळाले. यावर्षी अनेक संकटं आली, पण आम्ही मार्ग काढले. पण हे सर्व श्रेय प्रत्येक मुंबईकरांचं आहे", असं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.

माझ्यावर फक्त किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आरोप केले, बाकी कोणीही नाही. मी त्यांना अजुनही सांगेन की मला या आरोपांबाबत काही माहित नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आमची दुसरी इनिंग सुरु होईल

आमची दुसरी इनिंग सुरु होईल. उद्यापासून मी महापौर नसले तरीही मुंबईची काळजी मी घेणार. मी तोपर्यंत काम करणार, असंही त्या म्हणाल्या. या 2 ते 3 दिवसात काय घडामोडी घडतात त्यावर निवडणुकीबाबत स्पष्ट होईल. आम्ही भाजपला टक्कर देऊ कारण आमचं काम बोलतं. संपूर्ण देशात आपले मुख्यमंत्री हे अव्वल आहेत. आम्ही काम केलं आहे. त्यामुळे जे आमच्या समोर संधी येईल, त्याचं आम्ही सोनं करु यात कोणतीही क्षंका नाही. भगवा हा मुंबईत राहणार का, महापौर हा शिवसेनेचा होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

ज्या पद्धतीने धाडी पडलेल्या होत्या, ते भाजपमध्ये गेल्यानंतर चांगले कसे होतात. पण यशवंत जाधव आणि आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही लढा देऊ. मुंबईकर शिवसेनेचे नगरसेवक निवडूण देतात. मग महापौर आमचाच होणार. माझ्या पक्षाने दुसरी जबाबदारी दिली तरी मी कष्ट करणार, आमचे पक्ष प्रमुख जे सांगतील ते करणार, असंही त्या म्हणाल्या.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT