Sanjay Raut
Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

किरीट सोमय्यांची 'युवक प्रतिष्ठाण' काळा पैसा पांढरा करणारी संस्था; संजय राऊतांचा आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. राऊत यांनी आज पुन्हा किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केला. सोमय्या यांची युवक प्रतिष्ठाण काळा पैसा पांढरा करणारी संस्था आहे. राज्यातील घोटाळा बाहेर काढणारे स्वत: एक भ्रष्टाचारी आहेत. घोटाळा बाहेर काढण्याची सुरुवात सोमय्या यांनी केली होती. पण आता आम्ही शेवट करणार असल्याचा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला.

आम्ही फक्त किरीट सोमय्या यांचा घोटाळा बाहेर काढणार नाही. तर भाजपच्या (BJP) नेत्यांचाही घोटाळा बाहेर काढणार आहे. सोमय्यांचा खरा चेहरा वेगळा आहे. मोतीलाल ओसवाल यांचा ५ हजार ६०० कोटींचा घोटाळा झाला होता, त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्याकडून सोमय्या यांनी प्रतिष्ठाणसाठी किती पैसे घेतले, याची चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ्यात सोमय्यांचा सहभाग आहे असं म्हटल्यावर सोमय्या यांच काय म्हणणे आहे, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे युवक प्रतिष्ठाण हे काळा पैसा पांढरा करणारी संस्था आहे. सोमय्या मुंबईतील बड्या लोकांना ब्लॅकमेल करुन पैसे गोळा करत आहेत. हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी युवक प्रतिष्ठानला भरला जातो. सुरुवात सोमय्या यांनी केलेली आम्ही शेवट करणार आहोत, आम्ही फक्त सोमय्यांचा घोटाळा बाहेर काढणार नाही, तर भाजपच्या नेत्यांचा घोटाळा बाहेर काढणार, असा इशाराही राऊत यांनी दिला.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) भवनवर बोलताना राऊत म्हणाले, भारत देश एक आहे, कोणी कुठेही भवन करु शकते. आम्हीही आता उत्तर प्रदेशमध्ये एक भवन उभा करणार आहोत, असही राऊत म्हणाले. ते सरकारी काम असतं त्याच पक्षाचा काही संबंध नसतो, आम्हीही महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी अयोध्या, वाराणसीमध्ये महाराष्ट्राचे भवन बांधणार आहे, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

SCROLL FOR NEXT