Kirit Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

BMC कोव्हिड सेंटर घोटाळा; किरीट सोमय्यांची महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार

मुंबई महानगर पालिकेच्या कोव्हिड सेंटर घोटाळ्याविरोधात सोमय्या यांनी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलीये.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: श्रीधर पाटणकरांनंतर आणखी सहा घोटाळे उघड करण्याचा इशारा आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या कोव्हिड सेंटर घोटाळ्याविरोधात सोमय्या यांनी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलीये. महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात जाऊन सोमय्यांनी ही तक्रार दाखल केली.

मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोणत्याही प्रकारच्या टेंडरची पारदर्शक प्रक्रिया न करता एका बोगस कंपनीला मुंबईतल्या अनेक कोव्हिड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट दिले, असा आरोप करत सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने आपले पार्टनरशिप रजिस्ट्रेशन 26 जून 2020 ला झाले असल्याचे भासवले. पण, जे पार्टनरशिप डिड आणि बाकी कागदपत्र दिले ते बोगस होते असा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केलाय.

एक अशी कंपनी जी रजिस्टर झालेली नाही. ज्यांच्याकडे मनुष्यबळ नाही, कार्यालय नाही, अनुभव नाही, अशा बोगस कंपन्यांना कोव्हिड सेंटर (COVID Center) चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट देणं, आयसीयू युनिटचे कॉन्ट्रॅक्ट देणं, म्हणजे हजारो कोव्हिड रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचे काम लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेने केलाय, असा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केलाय.

या कंपनीला पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने ब्लॅकलिस्ट केल्याची गोष्ट त्यांनी लपवली. मुंबई महानगरपालिकेने ब्लॅकलिस्ट झाल्यानंतरही या कंपनीला 4 कोव्हिड सेंटरचे काम देणं म्हणजे मानवी जिवाशी खेळणं आहे, असंही ते म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT