ED Raids: मुख्यमंत्र्यांचे मेहुणे अडचणीत, ईडीकडून ठाण्यातील 11 सदनिका सील

ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातल्या 11 सदनिका सील केल्या आहेत.
ED Raids
ED RaidsSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई: ईडीने आज मुंबईत कुर्ला आणि ठाण्यात छापेमारी केली. यादरम्यान मोठी कारवाई करत ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याला मोठा दणका दिलाय. ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातल्या 11 सदनिका सील केल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतचं ट्विट करत माहिती दिली.

ठाण्यात आज पुष्पक ग्रुपची संपत्ती जप्त करण्यात आलीये. यामध्ये 6 कोटी 45 लाखांची प्रॉप्रटी जप्त करण्यात आलीये. ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधल्या 22 सदनिकांवरती कारवाई करण्यात आलीये.

श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे (Rashmi Thackeray) भाऊ आहेत. त्यामुळे ईडी आता ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून (Shivsena) आता काय प्रतिक्रिया येणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे.

तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. कोणतीही नोटीस न देता कारवाई करण्यात येत आहे. ईडीकडे (ED) काही पुरावे आहेत का? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपचे (BJP) शासन नसलेल्या राज्यातच अशा कारवाया सुरु आहेत. राजकीय किंवा अन्य हितासाठी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अगोदर ईडी हा शब्दही कोणाला माहित नव्हता. पण, आता ईडी गावागावात जाऊन पोहोचली आहे, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com