Kirit Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

प्रतिकात्मक हातोडा घेऊन किरीट सोमय्या दापोलीच्या दिशेने रवाना

मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्ट वर कारवाई करा अशी मागणी करत किरीट सोमय्या दापोलीच्या दिशेने रवाना

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई - महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज दापोली दौऱ्यावर आहेत. शिवसेना (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab)यांचं दापोलीमधील मुरूड येथे असणाऱ्या साई रिसॉर्टची ते पाहणी करणार आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर असताना त्याच्यावर अद्याप कारवाई का झालेली नाही याची विचारणाही ते प्रशासनाला करणार आहेत.

दरम्यान दापोलीला जाण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावरी त्यांनी उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार आणि ठाकरे सरकार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना त्यांना सोडणार नाही धडा शिकवणार असा निर्धार किरीट सोमय्या यांनी बोलून दाखवला आहे.

हे देखील पहा -

पुढे किरीट सोमय्या म्हणाले की, विधानसभेत भाषणात काल मुख्यमंत्री मला अटक करा घोटाळेबाज सरकारचा हातात हातोडा घेऊन सत्यानाश करणार आहे. जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. हा साडे बारा कोटी जनतेचा हातोडा आहे, जनतेचा हा हातोडा आहे. राज्याच्या जनतेसाठीचा हा महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहासारखाच सत्याग्रह असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. हे अनधिकृत बांधकामं तोडावं लागणार आहे. दोन रिसाॅर्ट आहे, एकावरच कारवाई तर दुसऱ्यावर का नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी विहारला आहे.

सगळे माफिया आहे, वसुलीवाले आहेत हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे, अटक करुन दाखवा. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र माझ्या मागे जनता आहे, मोदी सरकारची झेट कॅटेगिरी सुरक्षा आहे.आदित्य ठाकरेच्या प्रकरणाबाबत बोलण्याची हिंमत आहे का? मेव्हण्याच्या प्रकरणावर बोलायची हिंमत ठेवा. मला जेलमध्ये टाका म्हणून काल म्हणाले चोरी लबाडी पकडली तर हे असं वागणार हे चालू देणार नाही असे देखील ते यावेळी म्हणाले.

दरम्यान याआधी सुद्धा किरीट सोमय्या यांनी कथित बंगल्या प्रकरणी कोर्लई गावाचा दौरा केला होता. त्या पार्श्ववभूमीवर कोर्लईमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. दापोलीमध्ये सुद्धा काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमय्या यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी विरोध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT