KETAN AGRAWAL Case saam tv
मुंबई/पुणे

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Lohagad Fort Ketan Agrawal Death Case : लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय. कायदेशीर अडचणींमुळे सिया गोयल व चेतन चौधरी यांना निर्दोष सुटण्याची शक्यता आहे का? या हाय-प्रोफाइल प्रकरणाचे सविस्तर कायदेशीर विश्लेषण जाणून घ्या .

Namdeo Kumbhar

पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झालेल्या २६ वर्षीय केतन अग्रवाल प्रकरणाची देशात चर्चा सुरू आहे. १८ जून रोजी घडलेली ही घटना सुरुवातीला फक्त ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात मानली जात होती. पण अवघ्या तीन आठवड्यांत पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणाला एका भीषण आणि थंड डोक्याने रचलेल्या कटाचे स्वरूप आले आहे.

तरुण व्यावसायिक असलेल्या केतन अग्रवालचे लवकरच लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आता केतनची २० वर्षीय होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना अटक केली आहे. प्रेमसंबंधांत अडसर ठरत असलेल्या केतनचा काटा काढण्यासाठीच हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचा संशय आहे. सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला लोहगड किल्ल्यावरून थेट दरीत खाली ढकलून दिल्याचा खळबळजनक दावा पोलिसांनी केला आहे. अपघात दाखवून रचलेला हा मर्डर प्लॅन आता पोलिसांच्या तपासात उघड झाला असून, या हायप्रोफाईल प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे.

आरोपी सिया गोयलने केतन अग्रवालचा लोहगडावर खून केला, हा केवळ पोलिसांचा संशय कोर्टात गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसा ठरत नाही. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये ठोस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतो, तेव्हा कायदा पूर्णपणे 'परिस्थितीजन्य पुराव्यांवर' (Circumstantial Evidence) चालतो. या केसमध्ये गुन्ह्याची साखळी (Chain of Evidence) जोडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. धक्कादायक म्हणजे, जर या पुराव्यांच्या साखळीत एक जरी दुवा कच्चा राहिला, तर त्याचा थेट फायदा होऊन सिया आणि चेतन या प्रकरणातून सुटू देखील शकतात. त्यामुळे कोर्टात हा गुन्हा नेमका कसा सिद्ध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिया ठरवलेल्या लग्नामुळे नाखूश होती. त्यामुळेच केतनची हत्या केली, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषदेत संशय व्यक्त केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांनी केतनला संपवण्याचा कट रचला होता. कॅफेमधील भेटीत या हत्येचा प्लान रचण्यात आला होता. त्याचा सरावही करण्यात आला होता. त्यातच केतनच्या हत्येचा एक अयशस्वी प्रयत्नही झाला होता, असे पोलिसांनी मीडियासमोर सांगितलेय. पण न्यायालयात अद्याप काहीही सिद्ध झालेले नाही. सिया गोयल आणि चेतन चौधरी हे आरोपीच आहेत, दोषी ठरलेले नाहीत.

इंडिया टुडेच्या एका अहवालानुसार, कोणत्याही न्यायालयात आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पोलिसांना पुरावे द्यावे लागणार आहेत. कथित प्रेमप्रकरण हत्येमागील हेतू सिद्ध करू शकते. कॅफेमधील भेट आणि हत्येचा सराव हे एका कट केल्याचे म्हणू शकतो. त्याशिवाय फोन रेकॉर्ड्स, कपडे, सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन डेटा आणि अपघातानंतरचे वर्तन पुराव्यांची साखळी अधिक मजबूत करू शकतात. पण या सर्व गोष्टींना न्यायालयात तेव्हाच महत्त्व येईल, जेव्हा ही संपूर्ण साखळी ही 'केतन घसरला नाही, किंवा त्याने उडी मारली नाही, तर त्याला मुद्दाम ढकलण्यात आले होते' या निष्कर्षावर पोहोचेल.

मिळालेल्या माहितीनुसार, केतनला कोणी ढकलले हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा ठोस पुरावा नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. पोलिसांचा संपूर्ण खटला सध्या सिया आणि चेतनच्या कबुलीजबाबांवर अवलंबून आहे. पण याला काहीही महत्त्व नाही. वकील तनवीर अहमद मीर यांनी सांगितले की, पोलीस कोठडीत दिलेल्या कबुलीजबाबांना न्यायालयात काहीही किंमत नसते आणि ते निव्वळ 'निरर्थक' असतात. मीर हेच ते वकील आहेत ज्यांनी २००८ च्या आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडात तलवार कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करून त्यांची निर्दोष मुक्तता मिळवून दिली होती.

आरुषी हत्याकांडासारखी परिस्थिती

आरुषी-हेमराज हत्याकांडापेक्षा हा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करणारे दुसरे कोणतेही प्रकरण नसेल. त्या प्रकरणातही, एका कुटुंबावर मोठ्या प्रमाणावर संशय होता. लोकांनी त्यांना आरोपी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना दोषी ठरवले, परंतु उच्च न्यायालयाने याच कायदेशीर तत्त्वांच्या आधारे तो निकाल रद्द केला. त्या प्रकरणात, खुनाच्या रात्री घरात कोणाही बाहेरील व्यक्तीने प्रवेश केला नव्हता, हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अयशस्वी ठरला. बचाव पक्षाने एक प्रबळ पर्यायी शक्यता मांडली की, तिसऱ्याच व्यक्तीने (जसे की कंपाऊंडर कृष्णाने) हा खून केला असू शकतो. बचाव पक्षाला कृष्णानेच खून केलाय हे सिद्ध करण्याची गरज नव्हती; त्यांना फक्त न्यायालयाच्या मनात 'वाजवी शंका' निर्माण करायची होती.

...तर मग लोहगड प्रकरणात पुढे काय?

पुणे पोलिसांना सर्व पुरावे न्यायालयात सिद्ध करावे लागतील. तपास अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केलेला प्रत्येक दावा कायदेशीर पुराव्यात बदलावा लागेल. सियाची नाराजी हेच हत्येचे कारण होते, हे सिद्ध करावे लागेल. फोन रेकॉर्ड, चॅट्स आणि सीसीटीव्ही फुटेजमधून केवळ संशय नव्हे, तर हत्येचा कट रचला गेल्याचे सिद्ध झाले पाहिजे. केतन पडल्यानंतर आरोपींचे वर्तन कसे होते? त्यांनी कोणाकडे मदत मागितली का? त्यांनी केतनच्या कुटुंबाची दिशाभूल केली का? त्यांनी त्यांचे फोन बंद केले होते का? चॅट्स डिलीट केले होते का? या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतील.

पण या सगळ्यामुळे केवळ साखळी मजबूत होऊ शकते. हेतू असणे म्हणजे ढकलणे नव्हे. कट रचणे म्हणजे ढकलणे नव्हे. नंतर बोललेले खोटे म्हणजे ढकलणे नव्हे. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा दुवा ती कडा असेल, जिथून केतन खाली पडला. किल्ल्याचा उतार, ती कडा, येण्या-जाण्याचा मार्ग आणि केतनचे बूट यावरून हा एक साधा अपघात (घसरणे) होता असे दिसते का? आणि जर त्याला ढकलले गेले असेल, तर ते मुद्दामहून ढकलले होते की वादावादी किंवा झटापटीदरम्यान अचानक घडले? पुणे पोलिसांना न्यायालयात खुनाशिवाय इतर सर्व संभाव्य शक्यता पूर्णपणे नाकाराव्या लागतील. लोकांनी सियाला आधीच दोषी ठरवले असेल पण कोर्टाला ठोस पुराव्यांची आवश्यकता असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत

Tukaram Mundhe: मालिका, चित्रपट, सिरीजच्या शूटिंग सेटवर निकृष्ट दर्जाचे अन्न? थेट तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार

व्हिएतनाममध्ये ३३ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली

Ind Vs Eng : वैभव सूर्यवंशी, इशान किशन की तिलक वर्मा... कोणाला देणार डच्चू? इंग्लंडविरुद्ध संघात संजू सॅमसनची पुन्हा होणार एन्ट्री

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई! मृत व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतली, पोलिसांनी दार उघडला, आतील दृश्य बघून हादरले

SCROLL FOR NEXT