Actress Ketaki Chitale  SAAM TV
मुंबई/पुणे

Ketaki Chitale News: केतकी चितळेस न्यायालयात हजर करणार; भामरेचा शाेध सुरु

समाज माध्यमातील केतकी चितळे हिच्या लिखाणामुळे राजकीय क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त हाेत आहे.

विकास काटे

ठाणे : समाज माध्यमांवर (social media) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp leader sharad pawar) यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर नमूद करणा-या आणि पाेलीसांच्या ताब्यात असलेल्या अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) हिला आज (रविवार) ठाणे न्यायालयात (thane court) हजर करण्यात येणार आहे. (ketaki chitale latest marathi news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याने अभिनेत्री केतकी चितळे हिला शनिवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट एकने अटक केली. त्यावेळी पाेलीस ठाण्याच्या बाहेर तिच्या निषेर्धात एनसीपीच्या महिला कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणा दिल्या.

आज (रविवार) सकाळी ११ वाजता चितळेस ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच निखिल भामरेच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा देखील तपास ठाणे पोलीस करीत आहेत. त्यासाठी एक पथक नाशिक येथे जाणार आहे. त्यामुळे भामरे याला देखील ठाणे पोलीस अटक करण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

ठाणे रेल्वे स्टेशनजवळ 'शिवशाही'ला भीषण आग; बस जळून खाक, VIDEO

Ishan Kishan: सनरायझर्स हैदराबादला विजयाची हॅट्रिक मिळवून देऊनही इशानचं कर्णधारपद जाणार? काय आहे कारण?

Kidney health: सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर समजा किडनी निकामी होतेय; कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला

Buldhana Police: बुलडाण्यात पोलिसाला सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT