KDMC च्या शून्य कचरा मोहिमेचे 27 गावात तीनतेरा प्रदिप भणगे
मुंबई/पुणे

KDMC च्या शून्य कचरा मोहिमेचे 27 गावात तीनतेरा

कल्याण डोंबिवली महापालिकेने शून्य कचरा मोहीम राबवली असून सध्या त्याचे काटेकोरपणे पालन देखील केलं जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्रदिप भणगे

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने शून्य कचरा मोहीम राबवली असून सध्या त्याचे काटेकोरपणे पालन देखील केलं जात आहे. मात्र हि मोहीम फक्त शहरात यशस्वी करत महापालिका २७ गावांकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेतील नांदिवली तलाव परिसरात नागरिकांनी रत्स्याच्या कडेला निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ढिगाला आग लावून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनच निषेध व्यक्त केला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घंटा गाड्या कल्याण पूर्वेत तसेच २७ गावांमध्ये वेळेवर येत नसल्याने रस्त्याच्य्या कडेला मोठं मोठे कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. या कचऱ्याच्या ढिगांमुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणा नागरिकांच्या आरोग्यावर बेतण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नांदिवली परिसरात असलेल्या कचऱ्याच्या ढिगला आग लावून देत कल्याण डोंबिवली महिपालीका प्रशासनाच निषेध व्यक्त केला आहे.

वारंवार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कचऱ्याची समस्या निदर्शनास आणून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागरिकांच्या या आंदोलनाला केडीएससीचे मा.अपक्ष नमागरसेवक कुणाल पाटील यांनी देखील पाठिंबा देत आंदोलस्थळी भेट दिली आहे. तससह नागरिकांच्या या आंदोलनाला पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच महापालिकेने तातडीने कचऱ्याची समस्या मार्गी नलावल्यास उग्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAN 2.0: पॅन कार्ड 2.0 म्हणजे नक्की काय? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिक

Ola Electric Scooter: ई-सायकलीच्या किंमतीत मिळणार ओलाची नवीकोरी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Thank आणि Thank You यामधील नेमका फरक माहितीये का?

Maharashtra News Live Updates: अंधेरी पश्चिमेतील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Viral Video: हद्दच झाली! बाजारात अश्लील डान्स नंतर नागरिकांनी धु धु धुतले; तरुणाच्या कारनाम्याचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT