Kalyan Dombivli News Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा 'गडबड - घोटाळा'; बदल्यांच्या यादीत मृत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची नावे

Kalyan Dombivli News : केडीएमसीच्या बदली यादीत मृत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट झाल्याने महापालिकेचा निष्काळजी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. चुकीच्या यादीनंतर कर्मचारी संघटनांनी कारवाईची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • केडीएमसी बदली यादीत मृत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट

  • काही कर्मचाऱ्यांची चुकीने त्याच विभागात पुन्हा बदली

  • महापालिकेच्या निष्काळजी कारभारावर नागरिक व कर्मचारीवर्गाचा संताप

  • संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण - डोंबिवली

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. केडीएमसी प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बदलीची नवी यादी जाहीर केली. मात्र या यादीत अशा अशा गोंधळांच्या घटना समोर आल्या आहेत की नागरिकांसह कर्मचारीवर्गातही गोंधळाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाहीर केलेल्या या यादीमध्ये मृत कर्मचारी, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नावे देखील समाविष्ट असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इतकेच नव्हे तर, काही कर्मचाऱ्यांची ज्या विभागात ते आधीच कार्यरत होते त्याच विभागात पुन्हा बदली केल्याचा प्रकारही उघड झाला आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारचे घोळ घालून प्रशासनाने स्वतःचीच प्रतिष्ठा धुळीला मिळवली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. महापालिकेतील विभागाची कार्यपद्धती किती गलथान आहे, याचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

या सर्व घडामोडींमुळे केडीएमसी प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी कर्मचारी संघटनांकडून होण्याची शक्यता आहे. निष्काळजीपणा, नियोजनाचा अभाव आणि डेटा अपडेट न केल्यामुळे तयार झालेल्या या चुकीच्या यादीमुळे महापालिकेचा कारभार किती बेजबाबदार पद्धतीने चालतोय, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT