KDMC RUKMINIBAI HOSPITAL NEGLIGENCE: NEEDLE LEFT INSIDE 2.5-YEAR-OLD BOY AFTER RABIES INJECTION 
मुंबई/पुणे

KDMC Hospital: अडीच वर्षाच्या मुलाला इंजेक्शन देताना कमरेत अडकली सुई; रुक्मिणीबाई रुग्णालयाचा निष्काळजीपणा

KDMC Rukminibai Hospital : कल्याणमधील केडीएमसीच्या (KDMC) रुक्मिणीबाई रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Bharat Jadhav

  • अडीच वर्षीय मुलाला रेबीजचे इंजेक्शन दिल्यानंतर सुई कमरेतच अडकल्याचा आरोप.

  • एक्स-रे काढल्यानंतर सुई शरीरात असल्याचे स्पष्ट झाले.

  • शस्त्रक्रिया करून मुलाच्या कमरेतून सुई बाहेर काढण्यात आली.

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील उपचारांबाबत भोंगळ कारभार समोर आला आहे. अडीच वर्षीय मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर त्याची सुई मुलाच्या कमरेतच राहिल्याचे एक्स-रे नंतर समोर आले ऑपरेशन करून मुलाच्या कमरेतून सुई करण्यातआली कुटुंबीयांनी मुलाची तपासणी करून एक्स-रे काढल्यानंतर हाप्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी शिवसेना शिंदे गट पदाधिकारी अमित कोलेकर यांनी संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्व येथील काका ढाबा परसरात राहणाऱ्या सूर्यभान पांडे आणि त्यांची पत्नी काजल पांडे दोघे आपल्या अडीच वर्षाचा मुलगा कावेश याला घेऊन केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आले होते.

मुलाला एका पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मुलाला रेबीजचे इंजेक्शन दिले, मात्र इंजेक्शनची सुई मुलाच्या कमरेत अडकून राहिली. काजल पांडे यांनी सांगितलं की, मुलाची सुई बाहेर आलेली नाही मात्र डॉक्टरांनी सांगितले की ती इकडे तिकडे पडली असेल तुम्ही मुलाला घेऊन जा थोड्या वेळानंतर मुलाला त्रास होऊ लागला.

आई-वडील मुलाला घेऊन सायन हॉस्पिटलमध्ये गेले त्या ठिकाणी देखील त्यांना तिकडे पाठवण्यात आले, त्यानंतर त्यांनी मुलाला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अडकलेली सुई ऑपरेशन करून काढण्यात आली. या प्रकरणात मुलाच्या आई-वडिलांनी हॉस्पिटल प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे आमच्या मुलासोबत झाला दुसरा मुलासोबत असा प्रकार व्हायला नको असा त्यांच्या म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT