KDMC News Saam Digital
मुंबई/पुणे

KDMC News : कल्याणमधील नालेसफाईची पोलखोल; शिवसेना पदाधिकाऱ्याने KDMC च्या अधिकाऱ्यांना दिला इशारा

KDMC News Update : केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे. ८ दिवसांत महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल मात्र कल्याणमध्ये अद्याप नालेसफाईचं काम पूर्ण झालेलं नाही. त्यावरून शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

Sandeep Gawade

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आलाय महापालिकेकडून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे सुरू आहेत . आज शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व येथील वालधुनी नदी तसेच संतोषनगर नाला येथे सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी या नाल्यांमध्ये , नदीमध्ये गाळ पाहून महेश गायकवाड अधिकाऱ्यांवर चांगलंच बरसले.

दरवर्षी पावसाळ्यात या परिसरात शेकडो घरे पाण्याखाली जातात, नालेसफाईची कामे काम दरवर्षी एकाच ठेकेदाराला का दिलं जातं, या कामचुकार ठेकेदारवर कारवाई का होत नाही ? यंदा जर नालेसफाई झाली नाही तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा महेश गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिलाय.

कल्याण डोंबिवली शहरात पावसाळा तोंडावर आला असताना महापालिकेकडून ठिकठिकाणी नालेसफाई सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून नालेसफाई केली जात असल्याचा दावा केला जात आहे. नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातोय. कल्याण पूर्वेत नालेसफाईच्या कामाची शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यासोबत पाहणी केली .

कल्याण पूर्वेत वालधुनी नदी परिसरात गेले असता त्याठिकाणी नालेसफाई झाली नसल्याचं दिसून आलं. ही बाब महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. वालधुनी परिसरात नालेसफाई न झाल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. याचा फटका परिसरातील नागरिकांना बसतो. यंदा तरी नालेसफाई व्यवस्थित करा असे सांगत पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरवर्षी वालढूनी नदी परिसरात शेकडो घरे पाण्याखाली असतात . दरवर्षी नालेसफाईचे काम एकच ठेकेदाराला दिले जाते .तो काम करत नाही मात्र त्याच्यावर कोणतेही कारवाई केली जात नाही, यंदा नालेसफाई झाली नाही, तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Allu Arjun: AA22xA6 मध्ये पुष्पाचा नवा अंदाज; साऊथ चित्रपटात झळकणार हॉलिवूडचा व्हिलन

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Sambhajinagar Crime: विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याआडून मोठी फसवणूक, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा

Gold Rates: सोन्याला चकाकी! भावात वाढ झाली की घसरण? सोनं खरेदीपूर्वी वाचा आजचे लेटस्ट दर

LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

SCROLL FOR NEXT