Twenty nine families in Dombivli are worried after KDMC issued a notice to vacate a four storey building over alleged construction rule violations. saam tv
मुंबई/पुणे

Dombivli : डोंबिवलीतील 29 कुटुंबांची चिंता वाढली! इमारत रिकामी करण्याची नोटीस, रहिवाशांची केडीएमसीत धाव

kdmc notice to dombivli building residents : डोंबिवलीतील २९ कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. कल्याण - डोंबिवली महापालिकेने ते राहत असलेली इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. यानंतर रहिवाशांनी तातडीने पालिका मुख्यालयात धाव घेतली.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली | साम टीव्ही

डोंबिवली पूर्वेतील (Dombivli East) मुखर्जी रोडलगत असलेल्या चार मजली भावना इमारत (Building) रिकामी करण्याची नोटीस कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून बजावण्यात आल्याने २९ कुटुंबांतील सदस्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या इमारतीतील नागरिकांनी बुधवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन दिले.

सन २००२ साली महापालिकेने इमारत तोडण्याची नोटीस दिल्यानंतर रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने इमारत तोडण्यास स्थगिती दिली होती. कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका संबंधित व्यक्तीने मागे घेतल्याने उच्च न्यायालयातील स्थगिती आदेश रद्द झाला.

यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली. बांधकाम नियमांचे उल्लंघन करून इमारत उभारण्यात आल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे. रहिवाशांनी १५ दिवसांत इमारत रिकामी न केल्यास पाडकामाचा खर्च वसूल केला जाईल, असा इशाराही नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.

रहिवाशांनी सहकार्य न केल्यास पोलीस बळाचा वापर करण्यात येईल, तसेच वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे इमारतीतील २९ कुटुंबांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका आम्हाला बेघर करणार असेल तर आम्ही जायचे कुठे? असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT