Kalyan Hawker News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: फेरीवाला पुनर्वसन प्रश्नी केडीएमसी आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर, नव्याने हरकती सूचना मागवून मॉडेल वेडिंग झोन संकल्पना राबवणार

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या पुनर्वसन प्रश्नी केडीएमसी (KDMC) आयुक्त इंदुराणी जाखड यांनी पुढाकार घेतलाय.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Hawker News:

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या पुनर्वसन प्रश्नी केडीएमसी (KDMC) आयुक्त इंदुराणी जाखड यांनी पुढाकार घेतलाय. याबाबत बोलताना आयुक्त जाखड यांनी ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले असून त्यांच्या पुनर्वसनाकरीता पुन्हा येत्या दोन आठवड्यात पुन्हा हरकती सूचना मागविण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

फेरीवाला शहर समितीशी बैठक घेत फेरीवाला झोन निश्चीत करुन सर्वेक्षण करण्यात आलेल्या फेरीवाल्यांचे त्याठिकाणी पुनर्वसन करता येणार आहे. काही ठिकाणी मॉडेल वेडिंग झोन म्हणून ही संकल्पना राबविली जाणार आहे. घराजवळच बाजार असावा, अशी नागरिकांची मागणी आहे. त्या दृष्टीने देखील नियोजन सुरू असल्याचं जाखड यांनी सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण रेल्वे स्टेशन, डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात रस्ते व स्वतःवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालना मुश्किल झाले. तसेच स्टेशन परिसराला बकाल स्वरूप आलेय. महापालिकेने रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यान विरोधात कारवाई सुरू केली. तर दुसरीकडे फेरीवाल्यांनी या कारवाईला विरोध करत अधिक फेरीवाला धोरण राबवा व आमचे पुनर्वसन क,रा अशी मागणी केलीय. (Latest Marathi News)

त्यामुळे महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचा प्रश्न जटिल बनला आहे. केडीएमसीच्या आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी फेरीवाला पुनर्वसन प्रश्नी पुढाकार घेत फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत नियोजन सुरू केलंय . याबाबत बोलताना आयुक्त जाखड यांनी सांगितले की, नुकती फेरीवाला शहर समितीची बैठक झाली. ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण करण्यात आले आहे. त्यांच्या पुनर्वसनाची फेरीवाला शहर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. फेरीवाला झोन निश्चीत करण्यासाठी हरकती सूचना मागविल्या होत्या. त्याला नीट प्रतिसाद मिळाला नाही. येत्या दोन आठवड्यात पुन्हा हरकती सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर हा विषय फेरीवाला शहर समितीसमोर ठेवला जाईल. यानंतर फेरीवाला झोन निश्चीत करुन सर्वेक्षण करण्यात आलेल्या फेरीवाल्यांचे त्याठिकाणी पुनर्वसन करता येणार आहे.

काही ठिकाणी मॉडेल वेडिंग झोन म्हणून ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्यामध्ये जे आरक्षित भूखंड आहे. त्यामध्ये वेडिंग झोन जाहिर करायला पाहिजेत. जेणेकरून ज्याठिकाणी बाजार आहे. तो देखील खुला राहिल. काही नागरीकांची मागणी आहे. वेळेची बचत व्हावी याकरीता घराच्या जवळच बाजार असावा. त्यादृष्टीने नियोजन करीत आहे. लोकांनाही त्रास होऊ नये. तसेच सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन हाेईल. रस्त्याच्या बाजूला असलेले फूटपाथ हे नागरीकांच्या चालण्याकरीत आहे. ज्याठिकाणी फेरीवाल्यांचा अडसर आहे. फूटपाथ मोकळे नाहीत. त्याठिकाणी आपण कारवाई करीत असल्याचे आयुक्त जाखड यांनी सांगितले.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी डाेंबिवली स्टेशन परिसरात एका आयटी इंजिनिअर सुधीर पगारे या तरुणाला फेरीवाल्याचा धक्का लागल्याने त्याने जाब विचारला. त्याला फेरीवाल्यांनी मारहाण केली. या प्रकारच्या घटना वारंवार घडत असताना त्याविषयी आयुक्तांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. तर महापालिकेच्या स्तरावर देखील कारवाई सुरु असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकर बिझनेसमन होणार विराट कोहलीच्या RCBचा मालक, तब्बल १७५५३ कोटींच्या डीलची चर्चा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shocking: शाळेतील बोर्ड मिटिंगमध्ये अचानक कपडे काढू लागली महिला, अधिकारी पाहतच राहिले; VIDEO व्हायरल

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT