kdmc commissioner indurani jakhar unhappy on drainage cleanliness in kalyan Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan: नाल्यातील गाळ रस्त्यावर दिसल्यास कारवाई करणर, ठेकेदारासह अधिका-यांना केडीएमसी आयुक्तांची तंबी

kdmc commissioner indurani jakhar unhappy on drainage cleanliness in kalyan: कल्याण महापालिका आयुक्त इंदूराणी जाखाड यांनी महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाचा पाहणी दौरा करुन अधिकारी व ठेकेदारांना नालेसफाईबाबत सक्त सूचना केल्या.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नालेसफाईचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ हा रस्त्यालगत ठेवला जातो. गाळ वेळेवर न उचलल्याने रस्त्यासह परिसरात अस्वच्छता दुर्गंधी पसरते. आज महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी हा गाळ तत्काळ उचला, गाळ रस्त्यालगत आढळून आल्यास ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामकारीता 3 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्राकरीता करिता प्रत्येकी एक या प्रमाणे दहा कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.

एप्रिल महिन्यापासून नालेसफाईची कामे सुरु आहेत. नालेसफाईचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केलाय. नालेसफाईच्या कामाची पाहणी यापूर्वी कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आणि शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली होती. या तिन्ही लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या नालेसफाईच्या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आज महापालिका आयुक्त इंदूराणी जाखाड यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी काही नागरिकांकडून नाल्यात कचरा टाकला जात असल्याची खंत व्यक्त केली. दरम्यान नाल्यातला गाळ काढून नाल्याच्या लगत ठेवला जातो. वेळेवर गाळ न उचलल्याने परिसरात दुर्गंधी अस्वच्छता पसरते. त्यामुळे संबंध ठेकेदाराने गाळ तत्काळ हटवला पाहिजे अन्यथा संबंधित ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर देखील कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT