KDMC Commissioner News Saam Digital
मुंबई/पुणे

KDMC Commissioner News: केडीएमसीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली, नव्या आयुक्त कोण?, मनसेने मांडली व्यथा

KDMC Commissioner News: कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भाप्रसे डॉ. इंदुराणी जाखड यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

KDM Commissioner News

अभिजीत देशमुख

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भाप्रसे डॉ. इंदुराणी जाखड यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत जे आयुक्त लाभले ते पाहता जाखड या प्रथमच महिला आयुक्त महापालिकेला लाभल्या आहेत.

महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याची बदली झाल्यानंतर आयुक्त दांगडे यांनी १३ जुलै २०२२ रोजी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. दांगडे हे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मर्जीतील आयुक्त असल्याचे बोलले जात होते. १ वर्षे ३ महिने दांगडे यांनी महापालिका आयुक्तपदाची धुरा संभाळली. या विविध प्रकल्पांना गती देण्याचे काम केले.

मात्र सत्ताधारी पक्षातील माजी नगरसेवकांकडून दांगडे यांच्याकडून विकास कामे केली जात नसल्याचा आरोप केला जात होता. त्यावर अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी बैठका घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. दांगडे काही दिवसापूर्वी प्रशासकीय प्रशिक्षणाकरीता गेले होते, त्यावेळी त्यांच्या बदलीची आफवा उडविली गेली होती. तसेच ते नुकतेच काही काळ वैदकीय रजेवर गेले होते. तेव्हा देखील त्यांची बदली झाली असून ते पुन्हा कामावर रूजू होणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र अखेरीस आज दांगडे यांची बदली करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दांगडे यांच्याकडे राज्य सरकारच्या पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार देण्यात आला आहे. दांगडे यांच्या जागेवर डॉ. इंदूराणी जाखड यांची वर्णी लागली आहे. जाखड या राज्य सरकारच्या महिला विकास विभागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे त्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार तसाच ठेवून त्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सरकारने सोपविली होती.

आयुक्त फेरीवाल्यांसारखे येतात, जातात. फेरीवाले काही उठवले जात नाहीत - मनसे आमदार राजू पाटील

"राज्य सरकार कल्याण-डोंबिवलीत नवनवीन आयुक्तांची निवड त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच करून टाकतात. आमच्याकडे आयुक्त फेरीवाल्यांसारखे येतात व जातात. परंतु आमच्या स्टेशन बाहेरचे फेरीवाले काही उठवले जात नाहीत. असो ! आता येणाऱ्या नवीन आयुक्त नक्कीच चांगले बदल करतील, अशी आशा करू या.त्यांचे कल्याण-डोंबिवलीत मनसे स्वागत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

Sunday Horoscope : आनंदात, मौजमजा करण्यात जाणार या ३ राशींचा दिवस, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, लँडिंगवेळी विमानाचा भाग रनवेला धडकला

Maharashtra Live News Update: वीज पडून 23 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू,वर्ध्यातील घटना

SCROLL FOR NEXT