Kasba Peth Bypoll Election Result, Hemant Rasne  SAAM TV
मुंबई/पुणे

Hemant Rasne : भाजपच्या हेमंत रासनेंनी पराभव केला मान्य, पराभवाची कारणेच सांगितली!

Kasba Peth Bypoll Election Result : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव झाला. पराभवानंतर हेमंत रासने यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

Kasba Peth Bypoll Election Result : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून लागलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे.

पराभवानंतर हेमंत रासने यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवार म्हणून मी कमी पडलो. यामागची कारणे शोधणार आहे. पक्षाने मला संधी दिली, पण मीच कुठेतरी कमी पडलो. हा पराभव मला मान्य आहे, असे रासने यांनी सांगितले. (Latest Marathi News)

कसबा पोटनिवडणूक मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच धंगेकरांनी आघाडी घेतली होती. ती आघाडी कायम ठेवली. विशेष म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या भागांतील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरही धंगेकर हे आघाडीवर राहिले. अखेर धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला. तब्बल ११०४० मताधिक्याने धंगेकरांनी हा विजय मिळवला.

२८ वर्षांनी कसब्यात भाजपचा पराभव

कसबा मतदारसंघातील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तब्बल २८ वर्षांनंतर बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपचा पराभव झाला असून, काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.

याआधी १९९२ च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. २००९ मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपविरोधी असणारी नाराजी रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर पडल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया

कसबा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आजचा विजय हा जनतेचा आणि महाविकास आघाडीचा आहे, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

SCROLL FOR NEXT