Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Kasba Peth Election Result: 'शिंदे- फडणवीस सरकार जनतेला अमान्य...' कसब्यातील विजयानंतर अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar On Kasba Peth Election Result: यावेळी अजित पवार यांनी राहुल कलाटेंच्या उमेदवारीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले, ज्याचा फटका बसला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kasba Peth By-Poll Election Result: भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदार संघ भाजपच्या हातून निसटला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहे. 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे.

गिरीश बापट (Girish Bapat) यांचे नेहमीच वर्चस्व असलेल्या मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभाव स्वीकारावा लागला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Kasba Peth)

काय म्हणाले अजित पवार...

कसबा पेठ मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी "हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगत विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी ज्या प्रकारे शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. ते जनतेला आवडले नसून शिंदे फडणवीस सरकार जनतेला अमान्य असल्याची" टीका केली आहे.

"रवींद्र धांगेकर यांना उमेदवारी देऊन आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो. तळागाळात काम करणारा कार्यकर्ता म्हणून रविंद्रची ओळख आहे आम्ही सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री तिथे होते. सर्व गोष्टींचा वापर सत्ताधाऱ्यांनी तिथे केला. पण जनतेने आम्हाला कौल दिला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

चिंचवडमधील पराभवाबद्दल बोलताना अजित पवार यांनी "चिंचवडमध्ये सुद्धा आमचा विजय झाला असता. राहुल कलाटे याला मी सतत सांगितले पण त्यांनी ते ऐकले नाही. कारण तिथून तो उभा रहावा म्हणून काही जण सतत प्रयत्नात होते. नाहीतर दोन्ही जागेवर आमचा विजय झाला असता. पण सत्ताधारी पक्षाने सर्व यंत्रणांचा वापर केला. राहुल व नाना काटे या दोघांची मते बघितली तर ती भाजप उमेदवारा पेक्षा जास्त आहेत," असे अजित पवार म्हणाले..

दरम्यान, अत्यंत चुरशीची ठरलेल्या या निवडणूकीत रविंद्र धंगेकर जायंट किलर ठरले. त्यांनी ४० वर्ष भाजपच्या सत्ता असलेल्या कसबा मतदार संघात ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी ११ हजार ४० इतके मताधिक्य मिळवत हेमंत रासणे यांचा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakhi Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने परदेशात घेतलंय शिक्षण; आज गाजवतेय इंडस्ट्री

Maharashtra Live News Update: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

SCROLL FOR NEXT