Maharashtra Election
Maharashtra Election Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील दोन विधानसभा पोटनिवडणुकांची तारीख जाहीर, २७ फेब्रुवारीला मतदान

Shivaji Kale

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. महाराष्ट्र विधानसभेतील दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभा निवडणुकांच्या जागासाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारांना १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असून २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर या जागा रिक्त होत्या. आता या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.  (Maharashtra Political News)

दरम्यान, या दोन्हीही जागांवर महाविकासआघाडी (Mahavikas Aaghadi) आपले उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील सत्तासंघर्षानंतर ही दुसरी पोटनिवडणूक आहे. यापूर्वी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, अखेरीस शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या होत्या.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : धाराशिव मतदारसंघात ४१.२८ टक्के मतदान

Lizards News : बापरे! नागपूरमध्ये आढळली सापासारखी पाल; दुर्मिळ प्रजातीचा फोटो व्हायरल

Ranjitsinh Mohite-Patil News | रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची गळाभेट

प्रदर्शनाआधीच Jolly LLB 3 वादाच्या भोवऱ्यात, शुटिंग सुरू होताच न्यायालयात याचिका, नेमकं काय घडलं ?

Narendra Modi : कलम ३७०, राममंदिर अन्.. ४०० पार कशासाठी? PM मोदी थेट बोलले; काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT