MVA candidate Ravindra Dhangekar SAAM TV
मुंबई/पुणे

Kasaba Bypoll Election : मनसेचा पाठिंबा नेमका कुणाला? मविआच्या उमेदवाराची थेट मनसे कार्यालयात एंट्री

Kasaba Bypoll Election : कसबा पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होताना दिसत आहे. मविआ आणि भाजपने या मतदारसंघात सर्व ताकत पणाला लावली आहे.

Prachee kulkarni

Kasaba Bypoll Election : कसबा पोटनिवडणूक चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत रोज नवनवीन राजकीय अँगल समोर येताना दिसत आहे. एकीकडे मनसेने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज थेट मनसे कार्यालयात एंट्री घेतली. त्यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

पुण्यातील कसबा पेठ मतदार संघातील पोटनिवडणूक चांगलीच चर्चेत आहे. कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष एकत्र लढत असल्याने कसब्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांचा जोरदार प्रचार केला जात आहे. असे असताना आज धंगेकर यांनी जबरदस्त राजकीय धक्का देत मनसे कार्यालयात भेट दिली. धंगेकर कार्यालयात येताच मनसे नेत्यांनीही त्यांचे जोरदार स्वागत केले. यापूर्वी देखील त्यांनी मनसे आपल्याला पाठिंबा देणार असा विश्वास व्यक्त केला होता.

रवींद्र धंगेकर यांनी याआधी देखील मनसेमध्ये आपले सहकारी आणि मित्र आहेत असे विधान केले होते. त्यामुळे शहर मनसे रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देणार की पक्षादेशानुसार भाजपच्या उमेदवारामागे उभे राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला असला तरी शहर मनसेत अजूनही भूमिका स्पष्ट नाही. धंगेकरांच्या या भेटीमुळे मनसेचा नेमका पाठिंबा कुणाला आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT