karla malvali villagers criticises government small bridge washed away near indrayani river Saam Digital
मुंबई/पुणे

Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवरील साकव पुल वाहून गेला, मळवली कार्ला ग्रामस्थ आक्रमक

karla malvali villagers criticises government small bridge washed away near indrayani river: या मार्गावरून रोज दुग्धव्यवसायिक, भाजीपाला विक्रेते, कामगार, विद्यार्थी, पर्यटक यांची ये-जा असते. त्यामुळे इंद्रायणी नदीवरील पूल लवकरात लवकर खुला करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दिलीप कांबळे

लोणावळ्यात पावसाचा जाेरदार वाढला आहे. परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ हाेऊ लगाली आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे कार्ला मळवली गावांना जोडणारा इंद्रायणी नदीनजीकचा साकव पूल तयार पूल वाहून गेला आहे. यामुळे परिसरातील चार गावांचे दळणवळण पूर्णत: थांबले आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययाेजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कार्ला मळवली या गावांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका चार गावांना बसला आहे. यापुलाचे काम सुरू असताना ग्रामस्थांना रहदारीसाठी नदीवर एक साकव पूल तयार करण्यात आला होता.

दरम्यान पावसामुळे नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी साकव पूल वाहून गेला. त्यामुळे या गावातील दळणवळण यंत्रणा ठप्प होण्याची चिंता ग्रामस्थांना पडली आहे. त्यातच संथ गतीने सुरु असलेल्या कामाबाबत वारंवार तक्रार करुनही मार्ग निघत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT