karla malavli villagers demands to complete indrayani river bridge till may end Saam Digital
मुंबई/पुणे

Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करा, कार्ला मळवली ग्रामस्थ आक्रमक

Maval Latest Marathi News : सध्याच्या युगात टेक्नॉलॉजी प्रगत असताना देखील हे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पुलाच्या कामाला गती द्यावी अशी मागणी एकविरा कार्ला ग्रामस्थांनी केली आहे.

दिलीप कांबळे

मावळातील पश्चिम भागात मान्सूनच्या अगोदर जून महिन्याच्या आत पावसाची सुरुवात होते. त्यामुळे इंद्रायणी नदीचा प्रवाह वाढतो. याप्रवाहामुळे कार्ला मळवली गावातील नागरिकांचा जाण्या येण्याचा मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच कार्ला मळवली रस्त्यावरील इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. (Maharashtra News)

मागील वर्षी याच भागातील वडिवळे पूल पूर्ण न झाल्याने दहा ते बारा गावांना अडीअडचणीचा सामना करावा लागला अशी परिस्थिती मळवली या भागांमध्ये निर्माण होऊ नये यासाठी मे अखेरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी कार्ला मळवली गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

कार्ला मळवली रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील या पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा वडगांव मावळ बांधकाम विभागाला देण्यात आला आहे. यासाठी पुलाच्या कामाला गती देऊन एक महिन्याच्या आत पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी एकविरा कार्ला ग्रामस्थांनी केली आहे. सध्याच्या युगात टेक्नॉलॉजी प्रगत असताना देखील हे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जूनपर्यंत काम पूर्ण हाेऊन पूल खूला जाईल : बांधकाम विभाग

नागरिकांची समस्या पाहता इंद्रायणी नदीवरील हा पूल लवकरात लवकर करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, मे अखेरीस तर नाही मात्र 15 जूनपर्यंत कार्ला मळवली पूल वाहतुकीस खुला होण्याचं आश्वासन मावळ तालुका उपअभियंता बांधकाम विभागाचे बी एस दराडे यांनी कार्ला मळवली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT