मावळ येथील कार्ला मळवली दरम्यान असणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी आज (शुक्रवार) इंद्रायणी नदी किनारी ग्रामस्थांनी जन आंदोलन छेडले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आंदाेलनस्थळी उपस्थिती लावली हाेती. (Tajya Batmya)
कार्ला-मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्याने तो पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम ऑक्टोबर महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र, अद्याप याठिकाणी कामाचा वेग दिसून येत नाही. जून महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित काम पूर्ण होणार का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानूसार मे महिन्यात हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. अन्यथा कार्ला, मळवली परिसरातील जवळपास 25 गावांचा संपर्क तुटणार आहे. याचा फटका कार्ला, मळवली परिसरातील पर्यटन व्यवसायाला बसणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कार्ला परिसरातील या पुलावरुन ये जा करणाऱ्या या भागातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक या सर्वांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. तरी या पुलाचे काम 31 मे पूर्वी पूर्ण करा अन्यथा मोठे जन आंदोलन छेडू असा इशारा बांधकाम विभागाला ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.