panvel karjat  Saam tv
मुंबई/पुणे

कर्जत-पनवेल प्रवास फास्ट होणार; गेमचेंजर रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

panvel karjat railway corridor : कर्जत-पनवेल प्रवास जलद होणार आहे. गेमचेंजर रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Vishal Gangurde

कर्जत-पनवेल रेल्वेबाबत महत्वाची अपडेट समोर

रेल्वे मार्गिकेचे काम वेगाने सुरू

रेल्वे मार्गिकेचं काम ९५ टक्के पूर्ण

नवी मुंबई, कर्जत प्रवास लवकरच जलदगतीने होणार आहे. कर्जत-पनवेल रेल्वे मार्गिकेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या मार्गिकेच्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पाचं ९५ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात रेल्वे प्रकल्प नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ अंतर्गत काम हाती घेण्यात आलं आहे. पनवेल ते कर्जत हा २९.६ किमी लांबीचा दुहेरी मार्गाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प २,७८२ कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात येतोय. या मार्गामुळे पनवेल आणि कर्जतदरम्यान पर्यायी लोकल सेवा सुरू होत आहे.

नव्या मार्गामुळे कल्याणमार्गे धावणाऱ्या लोकलमधील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. या गेमचेंजर प्रकल्पासाठी आवश्यक असलेली खासगी आणि सरकारी जमीन संपादित करण्यात आली आहे. तसेच सर्व मोठे, छोटे पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे आणि अस्तरीकरणाची कामे बहुतांश पूर्ण झाल्याचे सांगण्यात आलं आहे. कर्जत येथील रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाला आहे. आता रुळ जोडणीचे काम सुरू आहे.

पनवेल रेल्वे उड्डाणपूलाचे काम देखील अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. तर मोहोपे आणि किरावली येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू देखील करण्यात आली आहे. पनवेल, चिखले आणि मोहापे येथील स्थानकांच्या इमारतींची कामे पूर्ण झाली आहे. चौक आणि कर्जत स्थानकांवरील कामेही वेगाने पूर्ण केली जात आहेत. जवळपास ६० किमी मार्गावर खडी टाकण्याचे काम झालं आहे.

कर्जत-पनवेल रेल्वे प्रकल्प किती टक्के पूर्ण झालं?

रेल्वे प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झालंय.

गेमचेंजर प्रकल्पासाठी किती खर्च करण्यात येतोय?

प्रकल्पासाठी सुमारे २,७८२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT