Karjat Drivers Brutal Beating Case Saam Tv
मुंबई/पुणे

Karjat Crime: कर्जत कारचालाकाला अमानुष मारहाण प्रकरण, शिंदे गटाच्या आमदाराच्या कथित बॉडीगार्डला अटक

Karjat Drivers Brutal Beating Case: कर्जतच्या नेरळमध्ये भररस्त्यात शिवाजी सोनावणेने या तरुणाने कारचालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Priya More

सचिन कदम, रायगड

कर्जतमध्ये भररस्त्यात कारचालकाला झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी नेरळ पोलिसांनी शिवाजी सोनावणेला रात्री अटक केली. कर्जतच्या नेरळमध्ये भररस्त्यात शिवाजी सोनावणेने कारचालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नेरळ पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपीला अटक केली.

शिवसेना ठाकरे गटाने हा व्हिडिओ ट्वीट करत मारहाण करणारा तरुण आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप केला होता. मात्र हा आरोप फेटाळून लावत हा तरुण आपला बॉडी गार्ड नसल्याचे आमदार थोरवे यांनी स्पष्ट केले. तो शिवसैनिक असून आपल्याला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला होता.

अमर बांदल यांना मारहाण करण्यात आली होती. शिवाजी सोनावणे यांच्या गाडीची काच फुटली. या वादातून शिवाजी सोनावणेने अमर यांना अमानुष मारहाण केली. नेरळ-कलंब मार्गावर पाडा येथील राजबाग सोसायटीच्या गेटवर ही घटना घडली होती. अमर बांदल हे आपल्या कुटुंबासोबत कारमधून जात होते. त्यावेळी शिवाजी सोनावणे तिथे आला आणि त्याने लोखंडी रॉडने अमर बांदल यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. अमर बांदल हे हात जोडून विनंती करत होते तरी देखील शिवाजी त्यांना मारतच राहिला.

अमर यांची पत्नी आणि मुलं कारमध्ये जोरजोरात रडत होते आणि मारू नका मारू नका असे बोलत होते तरी देखील शिवाजी थांबला नाही तो मारतच राहिला. बँटिंग करण्याच्या स्टाईलमध्ये आरोपीने अमर बांदल यांना मारहाण केली. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन चालकाने ही घटना आपल्या मोबाइलमध्ये कैद केली त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्री उशिरा शिवाजी सोनावणेला अटक केली. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

Maharashtra News Live Update: राज्यसभेत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

अंजनगाव पुतळा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून बाळराजे आवारे पाटील यांना अटक

Belly Fat: वजन होईल एका आठवड्यात कमी, सकाळच्या नाश्त्यात बनवा भाज्यांचे थालीपीठ

SCROLL FOR NEXT