kamshet police, arrests, youth Saam Tv
मुंबई/पुणे

Jabardast Daring : फाेन येताच पाेलिस धावले घटनास्थळी, दगडफेकीत झाले जखमी... हिम्मत न हारता सर्वांना पकडले

पोलिसांना घटनास्थळी काहीजण हातात लाठ्या काठ्या घेऊन दिसून आले.

दिलीप कांबळे

Kamshet Police Station: मावळातील (maval) कामशेत पोलीस ठाण्याचे हवालदार आणि आणि पोलिस (police) मित्राला (friend) मारहाण करुन जखमी (injured) करणाऱ्या संशयित आरोपींना कामशेत पोलीसांच्या पथकास पकडण्यात यश आले आहे. (Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जानेवारीला ताजे हद्दीतील एका पेट्रोल (petrol) पंप समोर काहीजण लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन दहशत निर्माण करत हाेते. ही माहिती पोलिसांना समजली. त्यामुळे तातडीने पोलिस घटनास्थळी पाेहचले.

पोलिसांना घटनास्थळी काहीजण हातात लाठ्या काठ्या घेऊन दिसून आले. पोलिसांना त्यांच्यावर नजर टाकली असता त्यातील काही जण हे गंभीर गुन्ह्यांतील संशियत असल्याचे दिसून आले. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांशी झालेल्या झटापटीत काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच मारहाण देखील केली.

यावेळी कामशेत पोलिस ठाण्याचे हवालदार राऊळ आणि पोलिस मित्र आसिफ शेख या घटनेत जखमी झाले. दरम्यान या प्रकरणी पाेलिसांनी दत्ता वाघमारे, मुस्ताफा शेख, मंगेश वाघमारे या पाेलिस रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Saree Look: साडी नेसलेल्या मुली मुलांना का आवडतात?

Maharashtra Live News Update: आबा बागुल यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

Kitchen Hacks : घरातील बाल्कनीत लिंबूचे झाड लावायचे असेल, तर या टिप्स नक्कीच वाचा

मतदानावेळी गोंधळ; शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

SCROLL FOR NEXT