Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

Kamshet: कोंबडयांचा टेम्पो चाेरणारे चिखलीतील पाच अटकेत

या प्रकरणाचा कामशेत पाेलीस कसून तपास करीत आहेत.

दिलीप कांबळे

मावळ : जून्या मुंबई पुणे महामार्गावरील (pune mumbai highway) अहिरवडे फाटा येथे कोंबड्यांच्या टेम्पोवर दरोडा टाकून सुमारे बारा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (lcb) पथकाने शिताफीने अटक केली. पोल्ट्रीत कोंबड्या वाहून घेऊन जाणाऱ्या टेम्पोला बुलेट आडवी मारत चालकाला चार जणांच्या टोळक्याने मारहाण करुन ही लूट केली हाेती. (maval latest marathi news)

या घटनेत १४४२ जिवंत कोंबडया तसेच टेम्पोसह ३ मोबाईल असा बारा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेल्याची तक्रार कामशेत पोलीस ठाण्यात (kamshet police station) नाेंदविण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास कामशेत पोलीसासह (police) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसांनी केला. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज बघून पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये वैभव विद्याधर होगाडे, रॉकी मोंटू शेख, सुखउद्दीन जलालुद्दीन शेख, देविदास संतोष काकडे, वैभव लक्ष्मण कांबळे (सर्व राहणार चिखली) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेतील सत्यम रमेश राठोड याचा शाेध सुरु असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT