Kalyan News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : सोशल मीडियावर 'गे' कमेंटवरून वाद; जाब विचारल्यानंतर टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

youth beaten by group in kalyan : फोटोवर 'गे' म्हणून कमेंट केली, याचा जाब विचारल्यानंतर वाद झाला. त्यानंतर पिझ्झा खाण्याच्या बहाण्याने बोलवत एका टोळीने या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : कल्याणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर तरुणाच्या फोटोवर 'गे' म्हणून कमेंट केली, याचा जाब विचारल्यानंतर वाद झाला. त्यानंतर पिझ्झा खाण्याच्या बहाण्याने बोलवत एका टोळीने या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या इन्टाग्रामवर अकाऊंटवर एका तरुणाने डीपी अपलोड केला. त्यानंतर या तरुणाच्या फोटोवर 'गे' म्हणून कमेंट केली. या तरुणाचा फोटो पाहून त्याला काही मुलांनी ]गे गे' म्हणून चिडवलं. याचा जाब विचारल्यानंतर इन्स्टाग्रामवरच वाद झाला. त्यानंतर तरुणाला पिझ्झा खाण्याच्या बहाण्याने बोलवत बेदम मारहाण केली आहे.

या मारहाणीच्या घटनेनंतर हे प्रकरण पोलिसांत गेलं. त्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोशल मीडियावर कमेंट करत चिडवल्यानंतर झालेल्या मारहाणीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याणमध्ये राहणाऱ्या तरुणाला इन्स्टाग्रामवरील फोटो पाहून काही जणांनी 'गे' म्हणून कमेंट केली. या कमेंट पाहून तो तरुण संतापला. त्यानंतर त्या तरुणाला कमेंट करणाऱ्या तरुणांनी पिझ्झा खायला बोलवलं, त्यानंतर या तरुणाला बेदम मारहाण केली.

यावेळी पाच तरुणांनी त्या तरुणाला बेदम मारण केली. या मारहाणीत तरुणाच्या नाकाच्या हाडाला दुखापत झाली. पीडित तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल; कारण काय? VIDEO

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

SCROLL FOR NEXT