KALYAN NEWS saam tv
मुंबई/पुणे

नकली केसांवरून चेष्टा केली थेट रॉड, दगड अन् दांडक्याने मारहाण; कल्याणमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी

Kalyan Waldhuni Clash Over Fake Hair Jokes: कल्याणच्या वालधुनी परिसरात नकली केसांवरून केलेली चेष्टा आणि आडनावावरून चिडवाचिडवी केल्याने दोन गटांत वाद झाला. लोखंडी रॉड, दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याचा आरोप असून दोघे जखमी झाले आहेत.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये साधी मस्करी चांगलीच महागात पडली. टक्कल आणि नकली केसांवरून केलेली चेष्टा, त्यानंतर आडनावावरून चिडवाचिडवी... आणि पाहता पाहता वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. वालधुनी परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात लोखंडी रॉड, दगड आणि लाकडी दांडक्याचा वापर झाल्याचा आरोप आहे. दोन्ही बाजूंचे तरुण जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात टक्कल आणि नकली केसांवरून सुरू झालेल्या मस्करीने दोन गटांमध्ये वाद पेटला. गुरुवारी सकाळी हुकुम यादव यांची सचिन यांच्या नकली केसांवरून चेष्टा सुरू होती. मात्र ही चेष्टा सचिन यांचे भाऊ निखील यांना खटकली. सकाळी नऊच्या सुमारास हुकुम यादव परतत असताना निखील यांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी रॉडने हुकुम यांच्या डोक्यावर आणि हातावर वार केल्याचा आरोप असून, त्यांच्या दंडाला चावा घेतल्याची तक्रारही करण्यात आली.

या मारहाणीत जखमी हुकुम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, निखील यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शंकराच्या मंदिराजवळ दर्शनासाठी जात असताना हुकुम आणि शिवम यांनी आडनावावरून चिडवत शिवीगाळ केल्याचा आरोप निखील यांनी केला. जाब विचारल्यानंतर धक्काबुक्की झाली, हुकुम यांनी फेकलेला दगड डोक्याला लागला, तर शिवम यांनी लाकडी दांडक्याने पाठीत मारहाण करत लाथाबुक्क्याही मारल्याचा दावा निखील यांनी केला आहे.

या झटापटीत गळ्यातील चांदीची चेन हरवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मस्करीतून सुरू झालेला वाद, चिडवाचिडवी आणि त्यानंतर रॉड, दगड अन् दांडक्याने मारहाण... या घटनेनंतर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत खा 'हा' पदार्थ; पोटाची वाढलेली चरबी कमी महिन्याभरात होईल कमी

Maharashtra News Live Update: देव दिवाळीचा झगमगाट! मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

Indian Traditions : मंगळसूत्रात काळे मणीच का असतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व

UP Election 2027: १३०मधून फक्त २६ जागा,काँग्रेसच्या हातातून अमेठी-रायबरेलीही काढलं! युपीमध्ये सपाचा मोठा गेम प्लॅन

New Rules December 2026: १ डिसेंबरपासून खिशाला बसणार फटका? SBI कार्डपासून गॅस सिलिंडरपर्यंत ७ मोठे बदल

SCROLL FOR NEXT