Kalyan news  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Kalyan news : कल्याणमधील कुटुंब दिवाळी साजरी करण्यात गुंग असताना मोठी दुर्दैवी घटना घडली. कल्याणमध्ये भलंमोठं झाड ३ घरावर कोसळल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

कल्याणमध्ये दिवाळीच्या दिवशी घरावर झाड कोसळलं

ऐन दिवाळीत कल्याणमध्ये पावसाचा कहर

कल्याणमध्ये झाड कोसळून तीन घरांचं मोठं नुकसान झालंय

कल्याणच्या अनुपम नगरमध्ये झाड कोसळून दुर्घटना

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये दिवाळीच्या दिवशीच दुर्दैवी घटना घडली आहे. कल्याण पश्चिममधील अनुपम नगरमध्ये घरावर झाड कोसळलं. या अपघातात घरांचं नुकसान झालंय. या घटनेत दोघे जखमी झाले आहेत.

कल्याण पश्चिमेतील अनुपम नगर परिसरात दिवाळीच्या संध्याकाळी मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठं झाड कोसळलं. या घटनेत एकूण तीन घरांचे मोठे नुकसान झालं. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल.

सायंकाळनंतर सुरू झालेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाड अचानक घरांवर कोसळलं. झाडाच्या फांद्यांखाली घरांचा मोठा भाग चिरडला गेला. या घटनेत घरातील सामानाचेही मोठे नुकसान झालं. स्थानिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर झाडाचा रस्ता अडवलेला भाग हटवला.

पावसामुळे कल्याणच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घरावर पडलेले झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. तीन कुटुंबांचे घर उद्ध्वस्त झाल्याने ते अक्षरशः रस्त्यावर आले आहेत.दिवाळीच्या दिवशीच घर उद्ध्वस्त झाल्याने परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि केडीएमसी च्या आपत्कालीन पथकांकडून घटनास्थळाची पाहणी सुरू आहे. पीडित कुटुंबांना तात्पुरती निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ऐन दिवाळीत कल्याणमध्ये पावसाचा धुमाकूळ

दिवाळीच्या उत्सवादरम्यान अचानक हवामानात बदल झाल्याने कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस कोसळला. कल्याण परिसरात विजेच्या कडकडाटासह मंगळवारी संध्याकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला. दिवाळीच्या आनंदात अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. यामुळे कल्याण शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने घरांमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या योजना विस्कटल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुक्या भाजीत मीठ जास्त झालंय? या ट्रिकने स्वाद होईल एका मिनिटात ठीक

कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, चुटकी वाजवून महिला, पुरुषांवर उपचार

Maharashtra Politics: काका-पुतण्याची दिलजमाई? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी एकत्र?

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

Thursday Horoscope : खर्चाचा हिशोब लागणार नाही; मिथुनसह ५ राशींच्या लोकांचा जवळच्या लोकांकडून घात होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT