अभिजित देशमुख, कल्याण प्रतिनिधी
Bali River Rafting Accident : इंडोनेशियातील बाली येथे शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या कल्याणच्या बिर्ला शाळेच्या शिक्षिका श्वेता पाठक यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रिव्हर राफ्टिंग दरम्यान बोट उलटल्याने दुर्दैवी घटना (Kalyan teacher death, Bali river rafting accident) घडली. ९ मे २०२५ रोजी ही घटना घडली. श्वेता यांचा मृतदेह सध्या बालीतील गैण्यार येथील पायांगण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. त्यांच्या नातेवाइकांनी आणि शाळा प्रशासनाने मृतदेह भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीचे आवाहन केले आहे.
कल्याणच्या बिर्ला शाळेच्या शैक्षणिक सहलीसाठी श्वेता पाठक आणि इतर विद्यार्थी-शिक्षक बालीला गेले होते. रिव्हर राफ्टिंगदरम्यान श्वेता प्रवास करत असलेली बोट पलटली आणि या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच श्वेता यांचे नातेवाईक आणि शाळा प्रशासनाचे कर्मचारी बालीला रवाना झाले. मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून, यासाठी केंद्र सरकारकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना ट्वीट करून या प्रकरणी तातडीने मदत करण्याची विनंती केली आहे. श्वेता यांच्या निधनाने कल्याणच्या शैक्षणिक समुदायात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि शाळेला या दुखद प्रसंगातून सावरण्यासाठी सर्व स्तरांवरून सहानुभूती मिळत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, लवकरात लवकर मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.