kalyan  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime : आठ वर्षांचा मुलगा, मारहाण केली, नंतर लादीवर बसवलं; शिक्षिकेचा निर्दयीपणा

Kalyan Crime News : अवघ्या आठ वर्षांच्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर त्याला लादीवर बसवल्याची घटना घडली. पोलिसांत मारकुट्या शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण पश्चिममधून खळबळजनक घटना समोर आली आहे. कल्याणमधील एका शाळेत अवघ्या आठ वर्षाच्या मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिक्षिकीने मारहाण केल्यानंतर मुलाला लादीवर बसवलं. शिक्षिकेने मुलाला मारहाण केल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत मारकुट्या शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्कुलमधील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे स्कुलमधील शाळेत शिक्षिकेने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्यानंतर शिक्षिकेने मुलाला मारहाण करत लादीवर बसवले. शिक्षिकीने विद्यार्थ्याला मारहाण करतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर, आपला राग मुलावर काढल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. शिक्षिकेने केलेल्या मारहाणीच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात मारकुट्या शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसत आहे?

शिक्षिका वेगाने मुलाजवळ जाते. त्यानंतर शेवटच्या बाकावर असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण करते. त्यानंतर इतर विद्यार्थी मागे डोकावून पाहतात. शिक्षिका विद्यार्थ्याला पुढे लादीवर बसण्यास सांगते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण?

विनोद धुरंदर हे पत्नी व दोन मुलांसह उल्हासनगर परिसरात राहतात. ते मध्य रेल्वे मध्ये सीनियर सेक्शन इंजिनियर पदावर कल्याण कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांचा आठ वर्षाचा मुलगा हा कल्याण मधील सेंट्रल रेल्वे स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये धुरंदर यांच्या आठ वर्षाच्या मुलाला वर्गातील शिक्षिकेने मारहाण करत लादीवर बसवले. मुलाने घरी आल्यावर त्यांच्याकडे तक्रार केली, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले होते. याबाबत धुरंदर यांनी शाळेत तक्रार केली होती. त्यानंतर पुन्हा एक मार्च रोजी या मुलाला शिक्षकाने मारहाण केली. मुलाने ही बाब सांगताच धुरंदर यांनी तत्काळ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ठाणे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात मारकुट्या शिक्षिकेविरोधात तक्रार नोंदवण्यात आली.

या तक्रारीनुसार पोलिसांनी रोहिनी तिवारी आणि प्रज्ञा कदम या दोन शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. तर दुसरीकडे विनोद धुरंदर यांनी रेल्वेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण कर्तव्यावर असताना माझ्या बनावट आणि बेकायदेशीर ड्युटी रोस्टरच्या आधारे माझे गैरहजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांना मदत करून माझा पगार बंद केला होता. याबाबत मी राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर हा निर्णय माझ्या बाजूने लागला. मात्र संबंधित अधिकारी मला तक्रार अर्ज मागे घे, असे सांगत होते. मात्र मी तक्रार मागे घेतली नाही, याच रागातून माझ्या मुलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT