Kalyan News  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : 'एकच प्याला' पडला महागात; दारुच्या दुकानातील एक्सपायरी डेट संपलेली बिअर प्यायल्याने ग्राहकाची प्रकृती बिघडली

Kalyan News : कल्याणमधील रिअल बिअर शॉपमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिअर शॉपमध्ये एक्सपायरी डेटची बिअर विक्री झाल्याची घटना समोर आली. या बिअरचे सेवन केल्याने एका ग्राहकाची प्रकृती खालावली

Vishal Gangurde

बिअर शॉपमध्ये एक्सपायरी डेट संपलेल्या बिअरची विक्री झाल्याचे उघड

एक्सपायरी झालेली बिअर प्यायल्याने ग्राहकाची प्रकृती खालावली

उत्पादन शुल्क विभागाने दुकानावर छापा टाकून मोठा साठा जप्त केलाय

बिअर शॉप मालकावर कारवाई सुरू

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

Kalyan : कल्याण परिसरातील एका बिअर शॉपमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दारू दुकानात ग्राहकांना एक्सपायरी डेट संपलेल्या बिअर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक्सपायरी झालेली बिअर प्यायल्याने एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याचा प्रकार समोर आला.

मुदत संपलेली बिअर प्यायल्यानंतर प्रकृती खालावल्याची तक्रार उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर धाड टाकली. तपासात दुकानात मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी डेट संपलेल्या बिअर साठा आढळून आला आहे. विभागाच्या अधिकाऱ्याकडून तो साठा ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधित बिअर शॉप मालकावर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एक्सपायरी बिअर विक्रीबाबत उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.

कल्याणमध्ये काय प्रकार घडला?

कल्याणमधील एका बिअर शॉपमध्ये एक्सपायरी डेटची बिअर विक्री झाल्याचा प्रकार समोर आलाय.

एक्सपायरी बिअर प्यायल्याने ग्राहकासोबत काय झालं?

एक्सपायरी बिअर प्यायल्याने कल्याणमधील ग्राहकाची प्रकृती बिघडली.

उत्पादन शुल्क विभागाने कोणती कारवाई केली?

विभागाने दुकानावर धाड टाकून एक्सपायरी बिअरचा साठा जप्त केलाय.

दुकानदारावर काय कारवाई होणार आहे?

दुकानदारावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लय भारी! आता Whatsapp स्टेटस ठेवताना नाही होणार चूक; मेटानं आणलं नवं फिचर

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा दणका, शिलेदार तुतारी फुंकणार|VIDEO

Dhruv Jurel: ब्लॉकबस्टर ८ षटकार अन् १५ चौकार! ध्रुव जुरेलचं शानदार शतक; विजय हजारे ट्रॉफीत चौकार-षटकारांचा पाऊस

महापालिका निवडणुकांतही घराणेशाही! भाजप आमदाराची मुलगी, मुलगा अन् दीराने भरला उमेदवारी अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT