Heartbreaking CCTV footage shows 14-year-old girl jumping from 19th floor in Kalyan’s Raunak City Society. 
मुंबई/पुणे

Kalyan News: धक्कादायक! १९ व्या मजल्यावरून उडी घेत १४ वर्षीय मुलीची आत्महत्या, हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्हीत कैद

14 Year Old Girl Jumps from 19th Floor: कल्याणमधील रौनक सिटी सोसायटीमध्ये एका १४ वर्षीय विद्यार्थिनीने १९ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवलंय. ही दुःखद घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. परीक्षेशी संबंधित ताणतणाव हे कारण असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Bharat Jadhav

  • कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी सोसायटीत १४ वर्षीय मुलीनी आत्महत्या केलीय.

  • सत्र परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिने आत्महत्या केली आहे.

  • आत्महत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात हळहळ व्यक्त.

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याण पश्चिम येथील हाय प्रोफाइल रौनक सिटी सोसायटीत आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीने इमारतीच्या १९व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विद्यार्थ्याना परीक्षेत नापास होण्याची चिंता अधिक असते.

कल्याण पश्चिमेकडील रौनक सिटी परिसरात काही महिन्यापूर्वी हे कुटुंब रहायला आले होते. आई, आजी आणि बहिणीसमवेत राहणारी विद्यार्थिनी उल्हासनगर मधील खाजगी शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होती. आज सहामाही परीक्षेच्या निकालाचा दिवस होता, मात्र आईला सुट्टी मिळत नसल्याने मोठी बहिण तिच्याबरोबर शाळेत गेली होती.

शिक्षकांनी तिला अभ्यासात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. इतका अभ्यास केल्यानंतरही परीक्षेत चांगले मार्क्स न मिळाल्याने ती तणावात होती. त्यातूनच तिने १९ व्या मजल्याच्या खिडकीच्या ग्रीलवर चढून क्षणार्धात खाली उडी मारली. या घटनेत तिचा मृत्यू झाला .तिला तातडीने रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.

कल्याण पश्चिम येथील हाय प्रोफाइल रौनक सिटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनीने १९ मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केलीय. ही घटना आज सकाळी घडली. विद्यार्थिनी उडी घेतल्याची घटना एका अपार्टमेंटमधील सीसीटीव्हीत कैद झालीय. १९व्या मजल्यावरून उडी घेतल्यानंतर विद्यार्थिनी पार्किगमधील एका दुचाकीवर आपटली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections : २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात, घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट

Methi Hair Oil Benefits: केसांच्या समस्यासाठी मेथी तेल ठरेल गुणकारी, कोंडा, केसगळती होईल लगेचच कमी

बॅगेत दगड भरून तलावात उडी मारली, कोल्हापुरात डॉक्टरने आयुष्य संपवलं, टोकाचा निर्णय का घेतला?

Womens Health: लहान वाटणाऱ्या समस्या महिलांसाठी ठरू शकतात घातक; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

SCROLL FOR NEXT