Midnight Horror in Kalyan Saam Tv Marathi
मुंबई/पुणे

कल्याणमध्ये मध्यरात्री तरूणाची दादागिरी; कोयता घेऊन धिंगाणा, गाड्या अडवून...

Midnight Horror in Kalyan: कल्याण पूर्वतून धक्कादायक बातमी समोर. मध्यरात्री मलंग रोडवर कोयता घेऊन तरुणाची धिंगाणा परिसरात भीतीचं वातावरण.

Bhagyashree Kamble

  • कल्याण पूर्वेतील मलंग रोडवर भयंकर घडलं

  • मध्यरात्री तरूणाची कोयता घेऊन दहशत

  • पोलिसांकडून तपास सुरू

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

कल्याण पूर्वेतील मलंग रोड, चेतना परिसरातून एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री उशिरा एक तरूण कोयता घेऊन धिंगाणा घालत होता. हातात कोयता आणि इतर धारदार शस्त्र घेऊन हा तरुण परिसरातील वाहनांना अडवत होता. अचानक समोर उभा राहत तो वाहनचालकांना धमकावत होता. याचा व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओतून तरूण कोयता घेऊन धिंगाणा घालत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कल्याण पूर्वेतील मलंग रोड चेतना परिसरातून उघडकीस आली आहे. मध्यरात्री उशिरा एक तरूण हातात कोयता घेऊन दहशत माजवत होता. घटनेच्यावेळी तरूण कोयता घेऊन रस्त्यावर फिरत होता. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना कोयता दाखवून भीती दाखवत होता. तसेच तरूणाने मोठ्या आवाजात आरडाओरड करत दहशत निर्माण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चेतना परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरानंतर स्थानिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच व्हिडीओच्या आधारे संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. तरूण नेमक्या कोणत्या कारणामुळे शस्त्रासह रस्त्यावर फिरत होता? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. या घटनेनंतर मलंग रोड परिसरातील सुरक्षेबाबत नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

Maharashtra Police: महापालिका निवडणुकांआधी पोलीस खात्यात मोठा फेरबदल, सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope: प्रेमात मिळेल यश, वैवाहिक जीवनात येणार आनंदी आनंद; जाणून घ्या कसा असेल नव्या वर्षाचा पहिला दिवस

SCROLL FOR NEXT