Auto Fare Rates Saam TV News
मुंबई/पुणे

Kalyan RTO: कल्याण डोंबिवलीकरांचा रिक्षा प्रवास महागला, मीटर अन् शेअर रिक्षाचे भाडे वाढले; नवे दर काय?

Share rickshaw fare increased: कल्याण-डोंबिवली परिसरात शेअर रिक्षांच्या भाड्यात ३ ते ५ रुपयांची वाढ झाली असून, प्रवाशांच्या खिशाला याचा फटका बसणार आहे. महागाईने सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

Bhagyashree Kamble

सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडलेल्या स्थितीत आहे. त्यात आता कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा रिक्षा प्रवास महागणार आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रात येणाऱ्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदी भागात शेअर रिक्षांच्या भाड्यात ३ ते ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तसेच मीटरप्रमाणेही ३ रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी सरकारने भाडेवाढ जाहीर केली होती. मात्र, रिक्षांचे मीटर रीकॅलिब्रेशन पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्षात आली नव्हती. आता जवळपास ९५% रिक्षांचे मीटर रीकॅलिब्रेशन पूर्ण झाले असून, त्यामुळे शेअर रिक्षांमध्ये प्रवासाचे अंतर लक्षात घेऊन ३ ते ५ रुपयांनी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.

कल्याण आरटीओ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने चाकरमानी राहतात. घर ते रेल्वे स्थानकांपर्यंत शेअर रिक्षाने प्रवास करतात. या भाडेवाढीचा फटका थेट सामान्य प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे.

कोरोना काळात रिक्षाचालकांनी शेअर रिक्षांच्या भाड्यात वाढ केली होती. तेव्हा देखील ३ ते ५ रूपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रिक्षाचालकांनी ३ ते ५ रूपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.

सध्या एका बाजूचा प्रवास १५ रुपयांमध्ये होत आहे. आता १८ ते २० रुपये मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे.

काही रिक्षा चालकांचा मनमानी कारभार

कल्याण आणि डोंबिवली परिसरात काही रिक्षा चालक आपल्या मनाप्रमाणे भाडे वसूल करतात. तर, काही कमी रिक्षाचालक मीटरप्रमाणे रिक्षा चालवतात. बाकीचे सरसकट मनाप्रमाणे भाडे प्रवाशांकडून घेतात. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसतो. अशातच आता रिक्षाच्या दरात वाढ झाल्यामुळे सामान्यांच्या खिशालाा आणखी कात्री बसण्याची शक्यत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदिल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा मोठा निर्णय! भाजपसोबत युती नाही

Mangal Shukra Yuti 2025: 18 महिन्यांनी बनणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' ३ राशींच्या नशीबी पैसाच पैसा

Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT