Kalyan News x
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याणकरांची वाहतूक कोंडीची कटकट संपणार, यु टाईप अन् मलंगगडचे रस्ते चकाचक होणार

Kalyan News : कल्याणमधील यु टाईप आणि मलंगगडचे रस्ते दुरूस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी २०० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे कल्याणकरांचे वाहतूक कोंडीचे टेन्शन मिटणार आहे.

Yash Shirke

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याण पूर्व मधील नागरिकांची खड्डे आणि वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. कल्याणधील यु टाईप रस्त्यासह महत्वाच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणास एमएमआरडीएची मान्यता मिळाली आहे. त्यासाठी तब्बल २०० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आले. रस्त्यावरील खड्डे दुरूस्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

कल्याण पूर्वेतील नागरिकांची अनेक वर्षापासून भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीसह खड्डेमय रस्त्याच्या समस्येतून सुटका होणार आहे. कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी, तर यु टाईप रस्त्याच्या बांधणीसाठी एमएमआरडीएकडून मान्यतेसह निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे त्रासलेल्या कल्याणकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून हा प्रश्न मार्गी लागला आहे.

कल्याण पूर्व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कल्याण पूर्वेत काटेमानिवली नाका- सिद्धार्थ नगरपासून तिसगाव नाका असा यु टाईप रस्ता तयार केला गेला. तर त्याचा या भागाच्या विकासासाठी फायदा होईल. त्याचबरोबर इच्छित स्थळी कमीत कमी वेळेत पोचता येऊ शकेल, अशी नागरिकाची मागणी होती. मात्र हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रखडला होता. या महत्त्वाच्या ७६ कोटी रुपयाच्या निधीतून निविदा काढण्यात आली. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक रस्ते खड्डेमय झाल्याने वाढलेली वाहतूक कोंडीमुळे ग्रासलेल्या मलंगगड रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाला देखील मान्यता मिळाली आहे. चेतना शाळा ते नेवाळी नका पर्यंतच्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी १२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कल्याण ग्रामीणमधील विकासकामासाठी निधी उपलब्ध झाला. या भागात मेट्रो प्रकल्प, रस्त्यासह अनेक पायाभूत सुविधासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, या मतदार संघाचे खासदार म्हणून डॉ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार - एकनाथ शिंदे

Bus Accident : शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बसउलटली; ३० विद्यार्थी जखमी, तीन जण गंभीर

Jaigad Fort History: भव्य वास्तुकला आणि कोकण किनाऱ्याचे अद्भुत दृश्य, जयगड किल्ल्याचे वैशिष्ट्ये आणि इतिहास

मुलींना मासिक पाळी येण्याचं योग्य वय कोणतं?

Fruits Importance: देवाला पाच फळे का अर्पण करतात?

SCROLL FOR NEXT