KALYAN RAILWAY STATION HAWKER ASSAULT CASE | AUTHORIZED VENDOR ATTACKED BY ILLEGAL HAWKER Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात तुफान हाणामारी, फेरीवाल्यांनी एकमेकांची डोकी फोडली

Kalyan News : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात अधिकृत फेरी व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्याला अनधिकृत फेरीवाल्याने धमकी देत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

Alisha Khedekar

  • कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात अधिकृत फेरीवाल्यावर मारहाण

  • अनधिकृत फेरीवाल्याने धमकी देत हल्ला केल्याचा आरोप

  • जखमी फेरीवाल्याने कल्याण रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली

  • रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात अधिकृत फेरी व्यवसाय करणाऱ्या एका फेरीवाल्याला अनधिकृत फेरीवाल्याने धमकावत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी पुन्हा एकदा चर्चेत आली असून प्रवासी आणि अधिकृत फेरीवाल्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेषराव सीताराम नांगरे हे रेल्वे प्रशासनाची अधिकृत परवानगी घेऊन एक्सप्रेस गाड्यांमध्ये फेरी व्यवसाय करतात. २७ मे रोजी ते नेहमीप्रमाणे कल्याण ते लोणावळा मार्गावरील गाड्यांमध्ये व्यवसायासाठी कल्याण रेल्वे स्टेशनवर आले होते. दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास ते मधुराई एक्सप्रेसची वाट पाहत मोठ्या ब्रिज परिसरात उभे होते. त्यावेळी गौरीशंकर दुबे नावाचा इसम त्यांच्या जवळ आला.

तक्रारीनुसार, आरोपीने “आप गाडी में नहीं आना, नहीं तो मैं आपको कर्जत में मारूंगा” अशी धमकी देत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी शेषराव नांगरे यांनी आपण अधिकृत ओळखपत्र आणि परवानगी घेऊन व्यवसाय करत असल्याचे सांगितले. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी गौरीशंकर दुबे याने नांगरे यांच्या अंगावर धाव घेत त्यांच्या डोक्यात बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात नांगरे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला. जखमी अवस्थेत नांगरे यांनी तातडीने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांची वाढती दादागिरी आणि प्रवाशांना होणारा त्रास याबाबत वारंवार तक्रारी होत आहेत. अधिकृत फेरीवाल्यांनाही अशा प्रकारच्या धमक्या आणि मारहाणीला सामोरे जावे लागत असल्याने रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT