Kalyan Railway Station, saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: कल्याण रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरून व्हायचे पसार; असे अडकले तिघे पोलिसांच्या जाळ्यात

Kalyan Crime News: प्रवाशांचे मोबाईल, रोकड लंपास करत पसार होणाऱ्या तिघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी तीन विविध ठिकाणाहून अटक केली

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News: लोकलमध्ये प्लॅटफॉर्मवर झोपेत असलेल्या प्रवाशांचे मोबाईल, रोकड लंपास करत पसार होणाऱ्या तिघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी तीन विविध ठिकाणाहून अटक केली. संतोष चव्हाण, शफिक खान, अनिल सहाणे अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या विरोधात याआधी देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

कल्याण रेल्वे स्थानकावर तसेच धावत्या लोकलमध्ये झोपेत असलेल्या प्रवाशांचे मोबाईल रोकड चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या. या चोरट्यांच्या मागावर कल्याण रेल्वे पोलीस होते. कल्याण बुकिंग कार्यालयात जवळ झोपेत असलेल्या एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला. या प्रवाशाने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली.

कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर तपास सुरु केला असता बुकिंग कार्यलयापासून काही अंतरावर एक व्यक्ती संशयास्पदरित्या आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ चोरी केलेला मोबाईल आढळला. पोलिसांनी या चोराला तत्काळ अटक केली. संतोष चव्हाण असे या चोराचे नाव आहे.

त्याचबरोबर पोलिसांनी धावत्या ट्रेनमध्ये तसेच प्लॅटफॉर्मवर झोपेत असलेल्या प्रवाशांचा मोबाईल रोकड लंपास करणाऱ्या शफिक खान, अनिल सहाणे या दोघांना देखील बेड्या ठोकल्यात. हे तिघे देखील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. त्यांनी आणखी किती गुन्हे केले त्याचा तपास आता पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापूरनंतर वांगणी जवळच्या कराव गावात बिबट्याची दहशत

Pune Police: आयुक्तांच्या नावाने एसीपींना दम; पोलीस आयुक्तांच्या PRO सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन

Telangana Accident: महाराष्ट्रातील मजुरांचा तेलंगानामध्ये भयंकर अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू, ११ गंभीर जखमी

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT