kalyan junction x
मुंबई/पुणे

Kalyan Crime : धावत्या एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक

Crime News Kalyan: एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपीला अकोला येथून अटक केली आहे.

Yash Shirke

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याण रेल्वे स्थानकात फिरण्यासाठी आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला रेल्वेने अकोल्याला नेत असताना इगतपुरी ते अकोला दरम्यान एका नराधमाने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती.या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या साहाय्याने ओळख पटवून नराधमाचा शोध सूरु केला .या प्रकरणी अखेर नराधम गजानन चव्हाण याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अकोल्यातून अटक केली आहे .आज त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर पीडित १६ वर्षीय मुलगी २९ जून रोजी कल्याण स्टेशन परिसरात आली होती. कल्याण पश्चिमेकडून पूर्वेकडे पादचारी पुलावरून जात असताना एका तरुणाने तिला हेरत तिच्याशी ओळख वाढवत तिच्याबरोबर चालत तो कल्याण पूर्वेकडे आला. त्याने तिच्याशी गप्पा मारत तिला आपल्या भावाच्या घरी नेले मात्र भावाने घरात घेण्यास नकार दिल्याने तो तिला परत कल्याण रेल्वे स्थानकात घेऊन आला. कल्याण स्थानकातून त्याने अकोल्याकडे जाणारी एक्स्प्रेस पकडली.

दरम्यान, इगतपुरी ते अकोला दरम्यान प्रवास करत असताना संबंधित तरुणाने पीडित मुलीवर जबरदस्ती केली. त्यानंतर तो तिला अकोला येथील आपल्या घरी घेऊन गेला. मात्र, कुटुंबीयांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला पुन्हा अकोला रेल्वे स्थानकात आणून सोडले.

स्थानकात असहाय्य अवस्थेत आढळून आलेल्या पीडित तरुणीची रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता, तिने संपूर्ण घटना उघड केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला असून, संबंधित प्रकरणाचा तपास आता कल्याण रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. तर या तरुणीला देखील कल्याण रेल्वे पोलिसाच्या हवाली करण्यात आले.

दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीची ओळख पटवून रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केला .हा नराधम अकोला येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी गजानन चव्हाण या नराधमाला शेखापूर अकोला जिल्ह्यातील शेखापूर येथून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sameer Wankhede VS Aryan Khan: समीर वानखेडेंना दिल्ली हाय कोर्टचा दणका, शाहरुखचा मुलगा आर्यनला दिलासा, काय घडलं?

हिवाळ्यात गरम पाण्यात आंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?

Ajit Pawar Plane Crash: ....तर असं काही घडलंच नसतं; अजित पवारांचे ड्रायव्हर श्यामराम मनवे असे का म्हणाले?

Nashik : मुंबईच्या दिशेने घोंघावत आलेलं 'लाल वादळ' वेशीवरच थांबलं!

Nails Cutting Tips: नखे कापण्याची योग्य पद्धत कोणती?

SCROLL FOR NEXT