Kalyan Politics Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Politics: विकासकामांच्या उद्घाटनाला का डावललं जातंय? भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी बोलून दाखवली मनातली खदखद

Kalyan Politics News: भाजपच्या युतीमध्ये जो कुणी उमेदवार असेल आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यालाच उमेदवारी देण्यात येणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या कामाच्या उद्घाटनात डावलले जात असल्याची खंत देखील व्यक्त केली.

Sandeep Gawade

अभिजीत देशमुख, कल्याण | ता. 14 जानेवारी, 2024

Kalyan Politics

उद्धव ठाकरे यांचा काल कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा होता. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Loksabha) शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल सांगितलं होतं. यावर गणपत आमदार गायकवाड यांनी उद्धव ठाकरे कितीही सभा घेऊदेत, मात्र या मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार निवडून येईल. कारण भाजपच्या युतीमध्ये जो कुणी उमेदवार असेल आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यालाच उमेदवारी देण्यात येणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या कामाच्या उद्घाटनात डावलले जात असल्याची खंत देखील व्यक्त केली.

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) व शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. भाजप आमदार गणपत गायकवाड व स्थानिक पदाधिकाऱ्याने अनेकदा शिवसेना शिंदे गटाकडून भाजपाला डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली होती. गणपत गायकवाड यांनी अनेकदा आक्रमकपणे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर देखील दिलं होतं . त्यामुळे कल्याण पूर्व मतदार संघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ नेत्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र आजही धुसफूस कायम असल्याचे दिसून येतेय .

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघात राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनात स्थानिक आमदार म्हणून आपल्याला डावलण्यात येत असल्याची खंत व्यक्त केलीय . याबाबत बोलताना आमदार गायकवाड यांनी राज्य सरकारच्या निधीतून विकास कामाचे उद्घाटन होत असेल त्या ठिकाणी आमदारांचे नाव तिथे पाठीवर पाहिजे. मात्र जाणीवपूर्वक माझं नाव टाकलं जात नसल्याचा आरोप केला असून नाराजी व्यक्त केली. पुढे बोलताना ही खंत नेहमीच असणार अशा पद्धतीने राजकारण चालत नाही. राज्य शासनाच्या निधी येतो त्यासाठी आमदारांचा पाठपुरावा असतो त्यावर आमदारांचा अधिकार असतो. पण तिथे खासदार सुद्धा उद्घाटनला येत नाहीत खासदारांचे कार्यकर्ते जाऊन उद्घाटन करतात. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव असल्याने त्या ठिकाणी उद्घाटनाला येत नाहीत.

वेळ आल्यावर उत्तर देणार

कल्याण पूर्वेत वर्चस्व असल्याने डावलला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली, मात्र पुढे बोलताना गायकवाड यांनी माझं वर्चस्व आजही होतं कालही होतं आणि पुढेही राहणार , जोपर्यंत लोक मला आमदार म्हणून निवडून देतात, तिथपर्यंत माझं वर्चस्व राहणार आहे. मी विकास कामं थांबवली अशी लोकांची दिशाभूल केली जात आहे, मात्र निवडणुकीच्या वेळेला विकास कामं कोणी थांबवली याचं उत्तर देईन, त्यामुळे लोकांना सुद्धा अंदाज येईल. विकास कामं थांबवली असं मोठ्या नेत्यांनी बोललं पाहिजे. कोणता एक माणूस उठून बोलत असेल तर त्याला मी उत्तर देणार नाही. मोठ्या नेत्यांनी बोललं तर नक्कीच उत्तर देईन, असा इशारा अप्रत्यक्षरीत्या शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

SCROLL FOR NEXT