Kalyan Political News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: भाजपमध्ये गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांची २ दिवसांत घरवापसी, नेमकं कल्याणमध्ये घडलं काय?

Kalyan Political News: कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. भाजपमध्ये गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांची २ दिवसांत घरवापसी केली.

Priya More
  • कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड

  • भाजपमध्ये गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांची २ दिवसांत घरवापसी

  • खोणी गावातील राजकीय घडामोड चर्चेत

  • मनसे आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कल्याणच्या खोणी गावातील ३० मनसे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण दोन दिवसांनंतर त्यांनी पुन्हा मनसेत घरवापसी केली. गैरसमजातून हा पक्षप्रवेश झाल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे कल्याणमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण ग्रामीणमधील खोणी गावात २ दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश हा गैरसमजातून झाल्याचा दावा करत संबंधित कार्यकर्त्यांनी मनसेत पुनरागमन केले. कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या स्पष्टीकरणात काही राजकीय घडामोडी आणि गैरसमजांमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता असे सांगितले. मात्र आपली विचारधारा आणि निष्ठा मनसेशीच असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मनसेत परतण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

खोणी गावातील या घडामोडीमुळे कल्याण ग्रामीणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक पातळीवर पक्षांतराचे राजकारण रंगत असताना संबंधित कार्यकर्त्यांच्या घरवापसीला मनसेने संघटनात्मक बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. तर भाजपकडून या घडामोडीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. खोणी गावातील या राजकीय घडामोडींमुळे आगामी स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, 'भाजपने आमच्या महिला कार्यकर्त्यांना फसवून त्याठिकाणी नेले होते. पक्षाचा कार्यक्रम असल्याचे सांगून त्यांना भाजपच्या कार्यक्रमात नेण्यात आले. त्याठिकाणी या महिला कार्यकर्त्यांना लक्षात आले की, हा मनसेचा कार्यक्रम नाही. त्याठिकाणी राजू पाटील उपस्थित नाही. त्या तिथली परिस्थिती पाहून गोंधळून गेल्या. आज त्या नेहमीप्रमाणे आमच्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित आहेत. त्यांनी तिथली परिस्थिती आम्हाला सांगितली. विनाकारण वातावरण दुषित करू नका. ज्यांना जिथे इच्छा आहे तिथे काम करू द्या. उगाच आमचं चालतं म्हणून आम्ही चालवणार असे करू नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही. नाही तर उत्तराला प्रत्युत्तर आम्ही देऊ शकतो.', असा इशारा स्थानिक मनसे नेत्याने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

SCROLL FOR NEXT