Kalyan Railway Station News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News : खळबळजनक! कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आढळला महिलेचा मृतदेह, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Kalyan Railway Station News : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास आणि चौकशी सुरू आहे.

Alisha Khedekar

  • कल्याण रेल्वे परिसरात जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

  • स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

  • आत्महत्या की घातपात याबाबत संभ्रम; तपास सुरू

  • मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Death Body Found In Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. कल्याण पश्चिमेकडील स्टेशन परिसरातील महालक्ष्मी हॉटेलजवळ एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

स्थानिक नागरिकांना हॉटेलजवळ संशयास्पद स्थितीत जळालेल्या अवस्थेत महिला पडलेली दिसून आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला फिरस्ता असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही घटना आत्महत्येची आहे की घातपाताचा प्रकार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसून पोलिसांकडून सर्व अंगांनी तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच स्थानिकांकडून चौकशी करण्यात येत आहे.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ५ मोठ्या मागण्या; जुलैमध्ये होणार मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, ६० दिवसात दिला निकाल

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

Maternal death: धक्कादायक घटना! इंटरनेटवरील व्हिडिओ पाहून पत्नीची घरातच प्रसूती करण्याचा प्रयत्न, तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू

ट्रेडिशनल टू मॉडर्न, मंगळसूत्राचे लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न, वटपौर्णिमेनिमित्त खरेदी करा

SCROLL FOR NEXT