Kalyan Leopard News Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Leopard News: टाटा पावर हाऊसमध्ये बिबट्याचा वावर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Kalyan Leopard News: कल्याण मुरबाड रोडवरील वरप गावाच्या मागील बाजूस टाटा पावर हाऊसमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. बिबट्या सीसीटीव्ही कैद झाला असून या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरल आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kalyan Leopard News:

कल्याण मुरबाड रोडवरील वरप गावाच्या मागील बाजूस असलेल्या टाटा पावर हाऊसमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. टाटा पावर हाऊस परिसरात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कैद झाला असून या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरल आहे. दरम्यान या घटनेनंतर वन विभागाने हा संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र बिबट्याचा शोध लागला नाही. जांभूळ जंगलाचा हा परिसर असून बिबट्या वाट चुकल्याने या भागात आला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

सध्या बिबट्या तेथून निघून गेला असून नागरिकांनी देखील सतर्क रहावे, रात्री अपरात्री एकट्याने फिरू नये. याचबरोबर वनविभागातर्फे वरब गावासह आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या जागृतीसाठी बॅनर लावण्यात आले आहेत. वनविभागाचे पथक देखील या परिसरात तैनात करण्यात आले आहे. सध्या या बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुरबाड, माळशेज घाट ते बारवी घाटापर्यंत विस्तीर्ण जंगल पट्टा आहे. मुबलक पाणी आणि सुरक्षित अधिवास असल्यामुळे मोठी वन्यजीव साखळी या भागात आढळते. वाघ, बिबट्यासारखे हिंस्र प्राण्यांचा वावर देखील आहे. अलिकडे या वन्य प्राण्यांचा वावर मानवी वसतीत वाढला आहे. त्यात बिबट्यांची संख्या मोठी आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत तर मानव आणि वन्य प्राण्यांच्या या संघर्षात अनेक बिबट्यांनी जीव गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT