Kalyan Train Fire News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Train Fire News: कल्याण रेल्वे यार्डातील मालगाडीला आग, अग्निशमन विभाग आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

kalyan Fire News In Marathi:

कल्याणमधून एक मोठं वृत्त हाती आलं आहे. कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या एका मालगाडीच्या एका बोगीला आग लागल्याची घटना घडली आहे. या लागलेल्या आगीत बोगीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Latest Marathi News)

कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या एका बोगीला आग लागल्याची घटना घडली. आज रविवारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्यानंतर काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं. काही क्षणातच या बोगीला आगीच्या ज्वाळा आणि धूराने वेढलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या बोगीला आग लागल्यानंतर सुदैवाने आजूबाजूला उभ्या असलेल्या बोगीला आग लागली नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं .

दरम्यान, या आगीत बोगीचे नुकसान झालं आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या कल्याण यार्डात गर्दुल्ल्यांचा वावर असतो. या बंद बोगीत गर्दुल्ले गेले असावेत. त्यातून आग लागली असावी, अशा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मालवाहू टेम्पोला आग

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोलीजवळ बोरघाटात शनिवारी रात्री उशिरा मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोन अचानक पेट घेतला. आगीचा भडका उडताच अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. त्यांनी आग विझविली, मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT