Kalyan Jilha Karagruh Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan News: मोक्काच्या आरोपीला दिली औषधे, निघाला गांजा; आधारवाडी जेलमधील घटनेने खळबळ

Kalyan Crime News: आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या मोक्काच्या आरोपीला देण्यासाठी त्याच्या मित्रांनी जेलबाहेरील पोलिसांच्या हातात औषधं दिली. पोलिसांनी औषधांची बाटली उघडताच त्यात गांजा निघाला.

Sandeep Gawade

अभिजित देशमुख, कल्याण

जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या मोक्काच्या आरोपीला देण्यासाठी त्याच्या मित्रांनी जेलबाहेरील पोलिसांच्या हातात औषधे दिली. पोलिसांनी औषधांची बाटली उघडताच त्यात गांजा निघाला. ही घटना समोर आल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी कैद्याला गांजा पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बर्डे आणि अविनाश जाधव दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

डोंबिवलीत राहणारे दोन तरुण गुरुवारी दुपारी आधारवाडी जेल जवळ आले होते. जेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तुरुंग पोलीस हवालदार रमेश सोमार्डे यांना मित्राला औषधं द्यायची आहे. आमची सर्व प्रक्रिया झाली आहे असं सांगितलं. पोलीस हवालदार सोमार्डे यांनी औषधं भरलेली पिशवी आपल्या हाती घेतली. जेलमध्ये औषध देण्याच्या आधी दोघांसमोरच त्याने पिशवी उघडली. पिशवीत काही औषधे होती. एक कायम चूर्णची बाटली होती. ही बाटली उघडताच त्या बाटलीत कायम चूर्ण नसून गांजा भरलेला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं.

याप्रकरणी आधारवाडी जेलचे जेलर यांनी खडकपाडा पोलिसांना माहिती आली. खडकपाडा पोलीस तात्काळ आधारवाडी जेलला दाखल झाले. औषधांच्या नावावर जेलमध्ये बंद असलेल्या मोक्काचा आरोपी संकेत दळवी याला गांजा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं.

खडकपाडा पोलिसांनी प्रेम बर्डे आणि अविनाश जाधव या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघे डोंबिवलीत राहणारे आहे. यांनी गांजा कुठून आणला. कोणाच्या सांगण्यावरुन मोक्काच्या आरोपीला गांजा पुरवित होते. याचा तपास आता खडकपाडा पोलिसांनी सुरु केला आहे, अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT